शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

शरद पवारांमुळेच मला उमेदवारी मिळाली - राजाभाऊ वाजे

By suyog.joshi | Updated: May 15, 2024 20:07 IST

शरद पवार दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. बुधवारी (दि.१५) वणी येथे सभेला जाण्यापुर्वी ते हाॅटेल एमराल्ड पार्क येथे थांबले होते. त्यावेळी राजाभाऊ वाजे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली.

नाशिक : शरद पवार यांच्यामुळेच मला उमेदवारी मिळाली असून यापूर्वी त्यांनी मला खूप मदत केली आहे असे वक्तव्य महाविकासआघाडीचे नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी केले. उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सभेपूर्वी वाजे यांनी हॉटेल एमराल्ड पार्क येथे दुपारी ४ वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. बुधवारी (दि.१५) वणी येथे सभेला जाण्यापुर्वी ते हाॅटेल एमराल्ड पार्क येथे थांबले होते. त्यावेळी राजाभाऊ वाजे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी पत्रकारांशी वाजे बोलत होते. शरद पवार यांनी माझ्याकडे माहिती मागितली. जी माहिती होती मी त्यांना दिली. त्यांनी कोणताही कानमंत्र दिला नाही. अगोदरच त्यांनी खूप मदत केली आहे. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गजानन शेलार, माजी आमदार नितीन भोसले, हेमंत टकले, श्रीराम शेठे, सुरेश दलोड, मुन्ना अंसारी आदी उपस्थित होते. यांनी घेतली भेटपालघरचे आमदार सुनील भुसारा, आमदार हिरामण खोसकर, मविप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे, संदीप गुळवे, संपतराव सकाळे, शिवसेनेच्या श्रद्धा दुसाने कोतवाल, संगिता सुराणा, माजी जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव आदी उपस्थित होते.कांदा उत्पादक अडचणीत-रोहित पवारगेल्या दहा वर्षांत देशात बेराेजगारी वाढली असून महिला असुरक्षित झाल्या आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनाठी काहीच केले नाही असा टोला शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला लगावला. शरद पवार यांच्याबरोबर रोहित पवारही नाशकात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी ते बाेलत होते. शेतमालाला भाव मिळत नसून शेतकरी देशोधडिला लागला आहे. सरकार उद्योगपतींसाठी काम करत असून त्यांना जनतेशी घेणेदेणे नाही. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. चार जूननंतरच असली नकली चेहरा कोणता हे स्पष्ट होईल असेही ते म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRajabhau Wajeराजाभाऊ वाजे