शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
7
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
8
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
11
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
12
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
13
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
14
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
15
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
16
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
17
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
19
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
20
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी

देवगाव येथील बोराचीवाडीत महिन्यापासून दाटला काळोख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 00:29 IST

देवगाव : जून महिन्याच्या प्रारंभी आलेल्या निसर्ग चक्र ीवादळ, वाऱ्यासह पावसाच्या तडाख्याने देवगाव परिसरातील बोरीचीवाडी येथील विद्युत रोहित्रामध्ये बिघाड ...

ठळक मुद्देविद्युत रोहित्र नादुरुस्त : महावितरण विभागाचा ढिसाळ कारभार

देवगाव : जून महिन्याच्या प्रारंभी आलेल्या निसर्ग चक्र ीवादळ, वाऱ्यासह पावसाच्या तडाख्याने देवगाव परिसरातील बोरीचीवाडी येथील विद्युत रोहित्रामध्ये बिघाड झाला. तेव्हापासून या गावाला तब्बल एक महिन्यापासून अंधारात दिवस काढावे लागत आहेत.महावितरण विभागाने याकडे दुर्लक्ष केले असून, रोहित्र शिल्लक नसल्याचे कारण देऊन विद्युत मंडळाने हात वर केले आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाºया बोरीचीवाडी येथील नागरिक वीजपुरवठा खंडित असल्यामुळे विद्युत मंडळाच्या ढिसाळ कारभारावर नाराज झाले आहेत. महावितरण विभागाने विजेची समस्या तत्काळ सोडवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.गावात प्रामुख्याने आदिवासी लोकवस्ती असल्यामुळे मोलमजुरी करून राहणारे लोक आहेत. आधीच लॉकडाऊनच्या काळात हाताला काम नसल्याने नागरिक आर्थिक पेचात असताना विजेच्या समस्येने त्यात भर पडली आहे. रेशन दुकानात रॉकेल मिळत नसल्यामुळे रात्रीच्या वेळी दिव्यामध्ये गोडेतेल टाकून कशीबशी रात्र घालवावी लागते. पावसाचे दिवस असल्याने सरपटणाºया प्राण्यांकडून लहान मुले तसेच आबाल वृद्धांना धोका पोहोचण्याची शक्यता आहे. महिनाभरापासून वीजपुरवठा खंडित असल्याने विजेचे दर्शन केव्हा होईल, असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. विद्युत मंडळाच्या निष्काळजीपणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यात महावितरण विभागाने अव्वाच्या सव्वा वीजबिल आकारल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.

एक ते दीड महिन्यापासून आम्ही अंधारात असून, त्यामुळे आम्हाला पाण्यासाठी वणवण करीत फिरावे लागत आहे. लॉकडाऊनच्या काळात मेणबत्ती, रॉकेल नसल्यामुळे अंधाराचा सामना करावा लागत आहे.- देवराम जाधव, नागरिक, बोरीचीवाडी

लॉकडाऊनमध्ये आॅइलचा साठा नसल्याने ट्रान्सफार्मर-मध्ये जुने आॅइल वापरू शकत नाही, तिथे नवीनच ट्रान्सफार्मर बसवावा लागेल. आम्ही दररोज पाठपुरावा करीत असून, येत्या दोन-तीन दिवसांत ट्रान्सफार्मर बसविला जाईल.- उद्धवेश बिरारी, उपअभियंता, त्र्यंबकेश्वर

टॅग्स :mahavitaranमहावितरण