शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

जाहिरातबाजी करुन उमेदवारी मिळत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 19:14 IST

छगन भुजबळ : येवल्यातील उमेदवारी मागणाऱ्यांना टोला

ठळक मुद्देअ‍ॅड. माणिकराव शिंदे यांनी जाहीरपणे भुजबळांना पत्र लिहित येवल्यातून विधानसभेची उमेदवारी देण्याची विनंती करत एकप्रकारे भुजबळ यांना थांबण्याचा सल्ला दिला होता.

येवला : मी कुठे उमेदवारी करावी याबाबतचा निर्णय पक्ष घेईल. येवल्यातून मी उमेदवारी करणार नसेल तर येवल्यात अनेक योग्य उमेदवार आहेत. जाहिरातबाजी करून उमेदवारी मागण्याची पद्धत कुठल्याच पक्षात नाही आणि दबाव आणून उमेदवारी मिळत नाही, असा टोला माजी उपमुख्यमंत्री व येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी इच्छुकांना पत्रकारांशी बोलताना लगावला.आषाढी एकादशी निमित्त भुजबळ यांनी तालुक्यातील कोटमगाव येथील विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उमेदवारीच्या चर्चेबाबत प्रथमच मौन सोडले. काही दिवसांपूर्वी भुजबळ यांचे समर्थक अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांनी जाहीरपणे भुजबळांना पत्र लिहित येवल्यातून विधानसभेची उमेदवारी देण्याची विनंती करत एकप्रकारे भुजबळ यांना थांबण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर, शिंदे समर्थकांनीही भुजबळ यांना निवेदन देत शिंदे यांच्या उमेदवारीची मागणी केली होती. याबाबत भुजबळ यांनी शुक्रवारी (दि.१२) पत्रकारांशी बोलताना सांगितले, मी कुठं उभे राहावे याची मागणी नागरिकांनी करणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यांचा मी सन्मान करतो. पक्ष ठरवेल त्या ठिकाणी मी निवडणूक लढविणार आहे. याबाबत सर्व निर्णय पक्ष घेईल. पक्षाकडे उमेदवारी मागताना पक्षाची विशिष्ट प्रक्रि या आहे. त्यासाठी जाहिरातबाजी करून दबाव निर्माण करत उमेदवारी मिळत नाही. येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी अंबादास बनकर यांच्यासह अनेक योग्य उमेदवार आहेत. याबाबत पक्ष निर्णय घेऊन उमेदवारी देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, संजय बनकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, प्रांतिक सदस्य अरु ण थोरात, पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश वाघ, कोटमगावच्या सरपंच सोनाली कोटमे, महिला शहराध्यक्ष राजश्री पहिलवान आदी उपस्थित होते.भुजबळ यांची कबुली  आनंदाची बाब २००४ च्या निवडणुकीत आमदार छगन भुजबळ यांच्या उमेदवारीची जाहीरपणे ढोलताश्याच्या गजरात मीच मागणी केली होती. यावेळेस फरक इतकाच आहे कि मी स्वत:करिता भुजबळ यांचेकडे जाहीर विनंती करून उमेदवारीची मागणी केली आहे. तथापि अंबादास बनकर यांच्यासह राष्ट्रवादीकडे अनेक योग्य उमेदवार असल्याची भुजबळ यांची कबुली समाधानाची व आनंदाची बाब आहे.- अ‍ॅॅड. माणिकराव शिंदे,जेष्ठ नेते, राष्ट्रवादी कॉंग्रेस

टॅग्स :NashikनाशिकChagan Bhujbalछगन भुजबळ