शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
5
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
6
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
7
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
8
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
9
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
12
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
13
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
14
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
15
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
16
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
17
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
18
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
20
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर

विचित्र रचनेमुळे विजयाचे गणित सोडविणे अवघड

By admin | Updated: February 17, 2017 23:59 IST

विचित्र रचनेमुळे विजयाचे गणित सोडविणे अवघड

मनोज मालपाणी : नाशिकरोडबिटको चौकापासून देवळालीगावपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या प्रभाग २१ मध्ये विभागनिहाय पक्ष व उमेदवारांची ताकद असल्याने व जाती-पातीच्या गणितावर विजयाचे गणित आखल्याने सर्व काही अवघड होऊन बसले आहे. जनसंपर्कासोबत इतर आमिषे व सेटिंग विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.  अ अनुसूचित गटातून रिपाइंचे नगरसेवक सुनील वाघ यांची मुलगी नयना वाघ, शिवसेना तनुजा बबन घोलप, भाजपा कोमल प्रताप मेहरोलिया, कॉँग्रेस आघाडी रेणुका अरुण गिरजे, मनसे प्रेरणा अशोक चंद्रमोरे, बसपा चित्रा योगेश भालेराव, भाजपा बंडखोर सरला महेंद्र अहिरे या निवडणूक रिंगणात आहेत. घोलप, मेहरोलिया या दोन्ही उमेदवार प्रभागाच्या एका बाजूच्या विभागातून आहे. तर इतर सर्व उमेदवार दुसऱ्या भागातील वेगवेगळ्या ठिकाणचे आहे. प्रभागाची रचना विचित्र पद्धतीने करण्यात आल्याने सर्वच उमेदवार स्थानिक आहेत, पण आणि नाही पण अशी स्थिती आहे.  ब नागरिकांचा मागासवर्ग गटातून शिवसेना नगरसेवक रमेश धोंगडे, भाजपा नितीन ऊर्फ टिंकू खोले, मनसे अस्लम भय्या मणियार, कॉँग्रेस आघाडी राजेंद्र बाळकृष्ण मोरे, बसपा प्रतिभा संजय भालेराव, एमआयएम सत्तार लतिफ तांबोळी, अपक्ष धनंजय रामदास मंडलिक रिंगणात आहेत. शिवसेनेतून निवडणुकीपूर्वी अस्लम मणियार यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला आहे. धोंगडे व मणियार या दोघांनी या प्रभागातील काही भागाचे प्रतिनिधित्व केले आहे. परिसरनिहाय प्रत्येक उमेदवार विजयाचे गणित आखत आहे. क सर्वसाधारण महिला गटात शिवसेना ज्योती शाम खोले, भाजपा जयश्री अजित गायकवाड, राष्ट्रवादी आघाडी नगरसेविका वैशाली दाणी, मनसे संगीता संतोष क्षिरसागर, बसपा परवीन नियामत शेख, कॉँग्रेस बंडखोर रिजवान अल्ताफ सैय्यद, अपक्ष प्रीती मोहन ढेंगळे या निवडणूक रिंगणात आहे. माजी नगरसेवक जयश्री गायकवाड व नगरसेवक वैशाली दाणी यांनी या प्रभागातील काही भागांचे प्रतिनिधित्व केले आहे. पक्षाच्या, नात्यागोत्याच्या व जातीपातीच्या मुद्द्यावर प्रत्येकजण विजयाचे गणित सोडवत आहे.  ड सर्वसाधारण खुला गटातून शिवसेना नगरसेवक सूर्यकांत लवटे, भाजपाकडून माजी नगरसेवक सतीश मंडलेचा, कॉँग्रेस आघाडीकडून माजी नगरसेवक रईस शेख, मनसे अशोक हिरामण ठाकरे, अपक्ष शेखर लक्ष्मण भालेराव, बसपा लालचंद शिरसाठ, एमआयएम गुलामगौस शेख, माकपा महेश आव्हाड, बहुजन विकास आघाडी अहमद अजीज शेख हे निवडणूक रिंगणात आहे. मंडलेचा यांनी निवडणुकीपूर्वी कॉँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला आहे. लवटे, रईस शेख, मंडलेचा, ठाकरे, आव्हाड हे प्रभागाच्या एका भागातील तर इतर उमेदवार दुसऱ्या विभागातील विविध ठिकाणचे आहे. केलेली कामे, पक्षाची ताकद, जनसंपर्क यावर प्रत्येक पक्ष व उमेदवाराने जोर दिला आहे. या प्रभागात दलित, मुस्लीम समाजाची लोकसंख्या चांगल्या प्रमाणात आहे. भौगोलिक परिस्थिती व प्रत्येक ठिकाणी त्या उमेदवारांची, पक्षाचा असलेला जोर यावरच प्रत्येक पक्ष व उमेदवार विजयाचे गणित सोडवत आहे.