शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा विकासाला इस्रोचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 01:48 IST

विज्ञानाचा वापर करून जिल्ह्याच्या विकासासाठी ‘इस्रो’ या भारतीय अंतराळ संशोधन संस्था व राष्टÑीय रिमोट सेन्सिंग सेंटरची मदत घेण्यात येणार आहे. प्राथमिक पातळीवर कृषी, रस्ते, वन व शहरी विकास या क्षेत्राचा आराखडा तयार करण्यात आला आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी व इस्रोच्या शास्त्रज्ञ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

ठळक मुद्देकरार : रस्ते, कृषी, वन, शहरी विकासाला प्राधान्य

नाशिक : विज्ञानाचा वापर करून जिल्ह्याच्या विकासासाठी ‘इस्रो’ या भारतीय अंतराळ संशोधन संस्था व राष्टÑीय रिमोट सेन्सिंग सेंटरची मदत घेण्यात येणार आहे. प्राथमिक पातळीवर कृषी, रस्ते, वन व शहरी विकास या क्षेत्राचा आराखडा तयार करण्यात आला आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी व इस्रोच्या शास्त्रज्ञ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.शहराची कशाप्रकारे वाढ झाली त्याचे चित्रीकरण करण्याबरोबरच, नागरिकांना आवश्यक सुविधा पुरविण्याबाबत उपाययोजनांचे या माध्यमातून नियोजन शक्य होणार आहे. किती हेक्टर जमिनीवर द्राक्ष, कांदा, भाजीपाला घेण्यात आला याची माहिती मिळणे सुकर झाले असून, त्याच्या आधारे भविष्यात कोणती पिके घ्यावीत याचा अंंदाज बांधणे सुकर होणार आहे.इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आराखड्याचे सादरीकरण केले. यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी, हे तंत्रज्ञान जिल्ह्यासाठी उपयोगी पडणार असून, पारदर्शी कारभार व गरजेनुसार कामे करण्यास ते मार्गदर्शक ठरणार असल्याचे सांगितले, जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी, विविध प्रकल्प राबविण्यासाठी या आराखड्याचा उपयोग होणार असल्याचे सांगितले.देशपातळीवर एखाद्या जिल्ह्याचा मायक्रो आराखडा इस्रोच्या मदतीने करण्याचा हा पहिलाच प्रयोग असून, यापूर्वी इस्रोने विविध मंत्रालये, प्राधिकरणांसाठी आपली सेवा खुली करून दिली आहे. त्याच धर्तीवर नाशिक जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांपासून उपग्रहाद्वारे चित्रण करण्यात आले. त्यात कृषी क्षेत्रातील द्राक्ष लागवडीखालील क्षेत्राची नोंद घेण्यात आली तर रस्ते विकासाठी सध्याच्या रस्त्याची अवस्था, चांगले व वाईट रस्त्यांचा आराखडा तयार करण्यात आला तर वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने वन खात्याच्या ताब्यात असलेले क्षेत्र व त्यावरील अतिक्रमण याची अद्ययावत माहितीही संकलित झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकisroइस्रो