शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोड रेल्वेस्थानकात आयसोलेशन ट्रेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 23:00 IST

नाशिकरोड : कोरोनाच्या संशयितांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यासाठी जागेची टंचाई येत असल्याने मध्य रेल्वेने आयसोलेशनची विशेष सुविधा असलेल्या रेल्वेगाड्या विकसित केल्या आहेत. नाशिकरोड रेल्वेस्थानकात २२ डब्यांची अशी गाडी दाखल झाली आहे.

नाशिकरोड : कोरोनाच्या संशयितांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यासाठी जागेची टंचाई येत असल्याने मध्य रेल्वेने आयसोलेशनची विशेष सुविधा असलेल्या रेल्वेगाड्या विकसित केल्या आहेत. नाशिकरोड रेल्वेस्थानकात २२ डब्यांची अशी गाडी दाखल झाली आहे.कोरोना संशयितांची संख्या आगामी काळात वाढण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. प्रशासनाने सरकारी रु ग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांचीही मदत घेतली आहे. कोरोना संशयितांना पंधरा दिवस क्वॉरंटाइनमध्ये ठेवण्यासाठी शाळा, मंगल कार्यालये, समाजमंदिरे आदी अधिग्रहित करण्यात आली आहेत. आणखी काही ठिकाणे अधिग्रहित करण्यात येत आहेत. रेल्वेची मदत यासाठी घेण्यात येत आहे.कोरोनाच्या संकटामुळे प्रवासी रेल्वेसेवा बंद आहेत. केंद्र सरकारने रेल्वे मंत्रालयाला प्रवासी रेल्वेगाड्या क्वॉरंटाइनसाठी तयार ठेवण्याचे निर्देश महिन्यापूर्वीच दिले होते. त्यानुसार काही गाड्यांमध्ये आवश्यक बदल करून बेड, पंखे, वैद्यकीय उपकरणे बसवून रेल्वेच्या विविध विभागांनी गाड्या तयार केल्या आहेत. मध्य रेल्वेने अशा गाड्या विकसित करून त्या मोजक्या स्थानकांमध्ये पाठविल्या आहेत. त्यातील एक गाडी नाशिकरोड रेल्वेस्थानकात आली आहे. मात्र अन्य शहरांमध्ये गरज भासल्यास ती तिकडेही पाठवली जाऊ शकते. स्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ४ वर सध्या सदर गाडी उभी करण्यात आली आहे.एकतर हा फलाट इतर तीन फलाटपेक्षा मोठा आहे. बावीस डब्यांची गाडी येथे सहज उभी राहू शकते. मालगाड्यांनादेखील तिचा अडथळा येत नाही. रेल्वे कर्मचारी, अधिकारी, कुली, सफाई कामगार यांचा वावर चौथ्या फलाटवर होत नाही. येथे रेल्वेची पार्सल, बुकिंग, रिझर्व्हेशन अशी कार्यालयेही नाहीत. संशयित कोरोना रु ग्णांना या विशेष गाडीत ठेवले तरी इतरांना लागण होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.----चौथ्या फ्लॅटफार्मवर तैनातकुंभमेळ्यात बांधण्यात आलेल्या फलाट क्रमांक चारवर आयसोलेशन ट्रेन उभी आहे. नागरिकांना तेथे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे जवान नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या सर्व प्रवेशद्वारांमध्ये तैनात करण्यात आले आहेत. सर्व प्रवेशद्वारे बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आली आहेत. ही गाडी सिन्नर फाट्याकडील चौथ्या फलाटवर ठेवण्यात आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक