शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

इस्लामी वर्ष  हिजरी सन १४३९ची होणार सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 01:14 IST

इस्लामी नववर्ष हिजरी सन १४३९ची सांगता मंगळवारी (दि.११) संध्याकाळी होऊन इस्लामी नववर्ष हिजरी सन १४४० ला प्रारंभ होणार आहे.

नाशिक : इस्लामी नववर्ष हिजरी सन १४३९ची सांगता मंगळवारी (दि.११) संध्याकाळी होऊन इस्लामी नववर्ष हिजरी सन १४४० ला प्रारंभ होणार आहे. सोमवारी संध्याकाळी चंद्रदर्शनाची शक्यता होती; मात्र चंद्रदर्शन घडले नसल्याने नववर्षाचा पहिला महिना ‘मुहर्रमुल हराम’ला प्रारंभ होऊ शकला नाही.  इस्लामी कालगणना चंद्रदर्शनावर अवलंबून असल्यामुळे प्रत्येक महिन्याच्या २९ तारखेला चंद्रदर्शन घेऊन महिना बदलला जातो. चंद्रदर्शन न घडल्यास चालू महिन्याचे तीस दिवस पूर्ण करुन पुढचा महिन्याला सुरूवात होते. तसेच उर्दू कालगणनेचा दिवस संध्याकाळी सुर्यास्तापासून बदलतो. मुंबईसह संगमनेर, मालेगावमधूनही चंद्रदर्शन घडल्याची ग्वाही स्थानिक चांद समितीला प्राप्त होऊ शकली नाही, त्यामुळे चालू उर्दू महिन्याचे तीस दिवस पुर्ण करुन मुहर्रम महिन्याला अर्थात इस्लामी नववर्षाला मंगळवारी संध्याकाळपासून प्रारंभ होणार असल्याची माहिती शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनी दिली. हिजरी सन १४३९चा अखेरचा महिना ‘जिलहिज्जा’ची सोमवारी २९ तारीख होती; मात्र चंद्रदर्शन कोठेही घडू शकले नसल्याचे चांद समितीचे हाजी सय्यद मीर मुख्तार यांनी सांगितले.मुहर्रम, गणेशोत्सव सोबतचयावर्षी मुहर्रम आाणि गणेशोत्सव हे दोन्ही सण एकाच कालावधीत साजरे होत असल्याचा दुर्मीळ योग जुळून आला आहे. राष्टÑीय एकात्मता, सामाजिक बांधिलकी व जातीय सलोखा कायम जोपासावा असाच संदेश दोन्ही समाजांसाठी हा योग देऊन जाणारा आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवदेखील बारा दिवस साजरा होतो आणि मुहर्रमचे सुरूवातीचे दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात आणि या कालावधीत करबलाच्या स्मृती जागविल्या जातात. ठिकठिकाणी प्रवचनमालांच्या माध्यमातून धर्मगुरूंकडून प्रवचनातून असत्य आणि अमानवी विचारधारेवर माणुसकी व सत्याचा ‘करबला’च्या मैदानात झालेला विजय यावर धर्मगुरू माहिती देतात.

टॅग्स :Muslimमुस्लीमReligious programmeधार्मिक कार्यक्रम