शहरं
Join us  
Trending Stories
1
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
2
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
3
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
4
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
5
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
6
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
7
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
8
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
9
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
10
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
11
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
12
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
13
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
14
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
15
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
16
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
17
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
18
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
19
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
20
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?

अनियमित पुरवठ्यामुळे उद्योजकांना टँकरने पाणी

By admin | Updated: October 13, 2015 22:28 IST

तक्रारी : वीज वितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

सिन्नर : माळेगाव आणि मुसळगाव येथील औद्योगिक वसाहतीत गेल्या आठ-दहा दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने उद्योजकांना टॅँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली असल्याची तक्रार उद्योजकांनी केली आहे. यामुळे उद्योजकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अनियमित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नासंदर्भात माळेगाव येथील निमा हाऊसमध्ये उद्योजक, निमाचे पदाधिकारी, एमआयडीसीचे अधिकारी व वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्योजकांनी पाण्यासंदर्भात तक्रारींचा पाढा वाचला. व्यासपीठावर निमाचे अतिरिक्त उपाध्यक्ष अरुण चव्हाणके, अतिरिक्त चिटणीस आशिष नहार, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता प्रकाश बंडोपिया, वीज वितरणचे कार्यकारी अभियंता डी. टी. सायनेकर, सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष अरुण चव्हाणके, उपाध्यक्ष पंडित लोंढे, तज्ज्ञ संचालक नामकर्ण आवारे, व्यवस्थापक कमलाकर पोटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शिंदे येथील वीज उपकेंद्रात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पाणीपुरवठा अनियमित होत असल्याचे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगून वीज मंडळाकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वारंवार होणाऱ्या जबाबदारी ढकलण्याच्या प्रकारामुळे निमाच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. वारंवार होणारे ब्रेकडाऊन कसे टाळता येतील यावर बैठकीत चर्चा झाली. शिंदे गावचा खंडित होणारा वीजपुरवठा एका रिंग सर्किटकडून घेऊन भविष्यात होणारे प्रकार कसे कमी करता येईल याबाबत चर्चा झाली. जुने पंप बदलून नवीन बसविण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता बंडोपिया यांनी दिली. त्याचबरोबर १० किलोमीटरपर्यंतची पाइपलाइन बदलण्यासंदर्भात प्रस्ताव असून, ते काम लवकरच सुरू होईल, असे ते म्हणाले. माळेगाव एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्राची ६ एमएलडी एवढी क्षमता वाढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वीज वितरणकडून नव्याने विकसित होत असलेल्या कंपन्यांसाठी नवीन वीज उपकेंद्र लवकरच सुरू करणार असल्याचे सहाय्यक अभियंता नीलेश रोहनकर यांनी सांगितले. बैठकीस पी. के. पाटील, व्ही. आर. पाटील, एस. पी. मिश्रा, विवेक पुरी, मनीष निकुंभ, रोहन एखंडे, एस. के. नायर, रवींद्र राठोड, योगेश मोरे, एल. एस. डोळे, स्वप्निल डोम्हने, आर. एस. सांगळे, एम.जी. कुलकर्णी, किरण खाबिया आदिंसह उद्योजक उपस्थित होते. अरुण चव्हाणके यांनी सूत्रसंचालन केले. आशिष नहार यांनी आभार मानले. (वार्ताहर)