शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएल, निवडणुकीमुळे चित्रपट खेळांचे वाजले बारा

By admin | Updated: May 13, 2014 19:05 IST

नाशिक : आयपीएलमधील ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट सामने आणि लोकसभा निवडणुकीचा चढलेला फिव्हर यामुळे शहरातील चित्रपटगृहे ओस पडली.

नाशिक : आयपीएलमधील ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट सामने आणि लोकसभा निवडणुकीचा चढलेला फिव्हर यामुळे शहरातील चित्रपटगृहे ओस पडली असून, चित्रपट निर्मात्यांनीही या कालावधीत बिगबजेट चित्रपट प्रदर्शित न करण्याचा व्यवहारीपणा दाखविला आहे. प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या खेळांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरविल्याने थिएटर्समालकांची आर्थिक कोंडी झाली आहे. सध्या आयपीएलचा धमाका सुरू आहे. दुपारी ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत चालणार्‍या क्रिकेट सामन्यांमुळे प्रेक्षकवर्ग सध्या छोट्या पडद्याला चिकटून बसत आहे. त्यातच स्पर्धेत चुरस वाढीस लागल्याने प्रेक्षकांची उत्कंठा प्रत्येक सामन्यागणिक वाढतच चालली आहे. विशेषत: मुंबई इंडियन्सने पहिल्या पाच सामन्यांत हार पत्करल्यानंतर पुढच्या सामन्यांमध्ये विजयाची मालिका सुरू ठेवल्याने मुंबई इंडियन्सच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आयपीएलचा धमाका सुरू असतानाच देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा ज्वर वाढला आहे. एक्झिट पोलने मोदी लाट मान्य केल्यानंतर देशाची कमान कोणाच्या हाती सोपविली जाते, याचे गुपित येत्या शुक्रवारी मतमोजणीनंतर उघड होणार आहे. वृत्तवाहिन्यांवरही चोवीस तास निवडणूकविषयक विश्लेषणाचा मारा सुरू असल्याने नागरिकांचा ठिय्या छोट्या पडद्यासमोर पडला आहे. आयपीएल आणि निवडणूक याचा परिणाम चित्रपटांच्या खेळांवर जाणवत असून, चित्रपटगृहांना प्रेक्षकांचा अत्यल्प प्रतिसाद लाभत आहे. सध्या शहरातील मल्टीप्लेक्स आणि एकपडदा चित्रपटगृहांत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये हवाहवाई वगळता अन्य चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. हिंदीवाले हुश्शार...आयपीएल आणि लोकसभा निवडणुकीचे वातावरण पाहता गेल्या दोन महिन्यांत प्रदर्शनापूर्वीच गाजलेला एकही बिगबजेट हिंदी चित्रपट थिएटर्सवर झळकलेला नाही. नाशिक शहरातील चित्रपटगृहांमध्ये सध्या हवाहवाई, ये है बराकपूर, कोयलांचल हे हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. याउलट प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांची संख्या जास्त आहे. सध्या चित्रपटगृहांमध्ये एक हजाराची नोट, सलाम, दुसरी गोष्ट, वात्सल्य, आजोबा, भाकरवाडी ७ कि.मी. हे मराठी चित्रपट झळकले आहेत. हिंदी चित्रपट नसल्याने मल्टिप्लेक्समध्येही मराठी चित्रपटांना त्यामुळे आपसूकच स्थान मिळाले आहे.