शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीत विलगीकरण कक्षासाठी प्रस्ताव मागविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 01:26 IST

कोरोनाचा प्रभाव सध्या कमी झाला असला तरी देशपातळीवर तिसऱ्या लाटेची व्यक्त होणारी शक्यता लक्षात घेता, संभाव्य रुग्णवाढीचा विचार करून शासनानेच आता ग्रामपंचायत पातळीवरच कमीत कमी ३० खाटांचे विलगीकरण उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी ग्रामपंचायतींना प्राप्त झालेल्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा वापर करण्यात येणार असल्याने यासंदर्भातील प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.    दोन दिवसांपूर्वीच या संदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. 

ठळक मुद्देगटविकास अधिकाऱ्यांना सूचना : ३० खाटांची हाेणार सोय

नाशिक : कोरोनाचा प्रभाव सध्या कमी झाला असला तरी देशपातळीवर तिसऱ्या लाटेची व्यक्त होणारी शक्यता लक्षात घेता, संभाव्य रुग्णवाढीचा विचार करून शासनानेच आता ग्रामपंचायत पातळीवरच कमीत कमी ३० खाटांचे विलगीकरण उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी ग्रामपंचायतींना प्राप्त झालेल्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा वापर करण्यात येणार असल्याने यासंदर्भातील प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.    दोन दिवसांपूर्वीच या संदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत गावपातळीवर कोरोना रुग्णांवर उपचाराची कोणतीच सोय नव्हती. परिणामी कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याबरोबरच रुग्णांचे मृत्यूदेखील मोठ्या प्रमाणावर झाले होते. कोरोनासदृश्य कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना कुटुंबीयांपासून अलग ठेवून  त्याच्यावर उपचार करण्यासाठी तालुक्याच्या मुख्यालयी अथवा महसुली गावात कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले हाेते, तर काही गावांमध्ये शाळा, समाजमंदिरात संशयित रुग्णांची व्यवस्था करण्यात आली होती. आता मात्र तिसऱ्या लाटेचा संभाव्य रुग्णवाढीचा वेग लक्षात घेता ग्रामपंचायतीच्या पातळीवरच ३० खाटांचे विलगीकरण कक्ष करण्याचा  निर्णय शासनाने घेतला असून,  त्यासाठी ग्रामपंचायतींना गेल्यावर्षी प्राप्त झालेल्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून त्यासाठी तरतूद करण्यात येणार आहे. पंधराव्या वित्त आयोगातून २५ टक्के रक्कम याकामी खर्च करण्यात येणार असून, ते खर्चाचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींनी या संदर्भात विकास आराखडा तयार करावा त्याचबरोबर गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेवकांनी ही कार्यवाही करण्याचे निर्देश ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिले आहेत. ग्रामपंचायतींचा होकार महत्त्वाचाग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात विलगीकरण कक्ष उभारण्याची व त्यासाठी पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याची मुभा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला असला तरी, त्यासाठी ग्रामपंचायतींची परवानगी व मागणी महत्त्वाची मानली आहे. साधारणत: ३० खाटांचे विलगीकरण कक्ष उभारण्याला प्राधान्य देण्यात आले आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदcorona virusकोरोना वायरस बातम्या