शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

संत सावता माळी मार्गावर अवजड वाहनांमुळे अपघाताला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 00:18 IST

वडाळा-पाथर्डी रस्ता व संत सावता माळी मार्गावरून अवजड वाहनांना प्रवेश बंद असूनही त्याची सर्रास वाहतूक सुरू आहे त्यामुळे नागरिकांना मात्र अक्षरश: जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे.

इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्ता व संत सावता माळी मार्गावरून अवजड वाहनांना प्रवेश बंद असूनही त्याची सर्रास वाहतूक सुरू आहे त्यामुळे नागरिकांना मात्र अक्षरश: जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे.  आठ वर्षांपूर्वी महापालिकेने वडाळ नाका ते राजसारथी सोसायटीपर्यंत आणि सुमारे तीन वर्षांपूर्वी राजे छत्रपती चौक ते पाथर्डी गावापर्यंत नागपूरच्या धर्तीवर रस्ता तयार करून पादचाऱ्यांसाठी पदपथ तसेच वाहनांच्या वेगमर्यादेसाठी रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकण्यात आले. या रस्त्यालगतच विनयनगर, साईनाथनगर, इंदिरानगर, सार्थकनगर, सदिच्छानगर, समर्थनगर, सूचितानगर यासह विविध उपनगरे असून, त्यामुळे दिवसभर वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यातच डीजीपी नगर क्रमांक-१ वडाळागाव साईनाथनगर चौफुली तसेच मुंबई-आग्रा महामागार्ला जोडणारा हा जवळचा मार्ग आहे. या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेशबंद असा स्पष्ट फलक लावण्यात आला आहे मात्र तरीही पुणे व मुंबईकडे शहरातून जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून अवजड वाहने या रस्त्याचा वापर करीत वाहनांचा वेग व रस्त्यावरील वर्दळ पाहता, पादचाºयांना जीव मुठीत घेऊनच मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यामुळे वडाळापाथर्डी रस्ता आणि संत सावता माळी मार्ग हे दोन्ही मार्ग अवजड वाहनांमुळे मृत्यूचा सापळा बनत चाललेला आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक