शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकला सर्व्हिसरोडवर आलेल्या इमारतीमुळे अपघाताला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 11:57 IST

नाशिक : फाळके स्मारकाजवळ समांतर रस्त्याला अगदी खेटून असलेल्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या कार्यालयामुळे येथे रोजच अपघात होत असून, हे कार्यालय स्थलांतरित करून इमारत हटविण्याची मागणीही केली जात आहे. तथापि, या खूप जुन्या इमारतीच्या अधिकृततेविषयी मात्र साशंकता असून, त्यामुळेच आजवर कारवाई झाली नसावी असाही एक सूर ऐकायला मिळतो आहे.फाळके स्मारकाच्या ...

ठळक मुद्दे  पुरातत्व खात्याच्या कार्यालयामुळे अडचण, स्थलांतराची मागणी

नाशिक : फाळके स्मारकाजवळ समांतर रस्त्याला अगदी खेटून असलेल्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या कार्यालयामुळे येथे रोजच अपघात होत असून, हे कार्यालय स्थलांतरित करून इमारत हटविण्याची मागणीही केली जात आहे. तथापि, या खूप जुन्या इमारतीच्या अधिकृततेविषयी मात्र साशंकता असून, त्यामुळेच आजवर कारवाई झाली नसावी असाही एक सूर ऐकायला मिळतो आहे.फाळके स्मारकाच्या अलीकडे हॉटेल तुळजाजवळ समांतर रस्त्यावरच वाटावी इतकी रस्त्यात असलेली एक जुन्या बांधकामाची बैठी इमारत आहे. गेल्या सुमारे दोन अडीच दशकांपासून येथे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे कार्यालय याच इमारतीत असून, तेथूनच पांडवलेणी व अन्य गोष्टींचे कामकाज चालते. मुंबई-आग्रा महामार्गाचे सहापदरीकरण होण्याआधी ही इमारत समांतर रस्त्यापासून लांब आणि खूपच दूर हाती. परंतु कालौघात रस्ते मोठे व रु ंद झाल्याने इमारतीचा काही भाग रस्त्यावर आला आहे. परिणामी दोन्ही बाजूने वापर असलेल्या या सर्व्हिस रस्त्यावर या इमारतीमुळे अपघात होऊ लागले आहेत. पाथर्डी फाट्याकडून फाळके स्मारकाकडे जाणाºया वाहनांना समोरून येणारे वाहन दिसत नाही. म्हणजेच ब्लार्इंड टर्न असून या ठिकाणी थोडेसे वळणही असल्याने वाहनांना अरु ंद रस्त्यामुळे अपघात होत आहे.या इमारतीविषयी येथील रहिवासी पांडुरंग शिरसाठ सांगतात की, ही इमारत खूप जुनी असून धर्मराज मित्र मंडळांनी ती वाटसरूंच्या विश्रांतीसाठी बांधली होती. सातबारावर तिचा चावडी म्हणून उल्लेख असल्याचा शिरसाठ यांच्यासह परिसरातील नागरिकांचा दावा आहे. कालांतराने येथे पुरातत्व विभागाचे कार्यालय सुरू झाले, मात्र त्यांच्याकडे कोणतेही अधिकृत ताबापत्र, नोंदणी अशी कोणतेही कागदपत्र नाहीत, मात्र पाणीपट्टी आणि वीजबिल कार्यालयाच्या नावाने येत आहेत. मात्र पुरातत्व विभागाचे अधिकारी अनिभज्ञता दर्शवत असून, गेली सुमारे पंधरा-वीस वर्षे इथेच कार्यालय असल्याने ते अनधिकृत नसल्याचे सांगतात. ही इमारत अधिकृत की अनधिकृत किंवा कोणाच्या नावे या तांत्रिक बाबींचा काय तो शोध लावावा व आता ती रस्त्याला अडथळा ठरत असल्याने अतिक्रमित ठरवून ती महामार्ग प्राधिकरणाने हटवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.