शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

फडणीस गु्रप तपासाबाबत गुंतवणूकदारांची आयुक्तांना विचारणा

By admin | Updated: July 1, 2017 00:07 IST

कोट्यवधीची फसवणूक ; गुंतवणूकदारांची चार तास पोलीस आयुक्तालयात ठाण

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोट्यवधी रुपयांची फसवणूक प्रकरणी पुणे येथील फडणीस ग्रुपच्या संचालकांच्या तपासात पोलीस दिरंगाई करीत असल्याचा आरोप करीत शेकडो गुंतवणूकदारांनी शुक्रवारी (दि़ ३०) पोलीस आयुक्तालय गाठत दिरंगाईबाबत जाब विचारला़ सुमारे चार तास पोलीस आयुक्तालयात ठाण मांडलेल्या गुंतवणूकदारांची पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी या गुंतवणूकदारांची भेट घेत त्यांच्या शंकांचे निरसन केले तसेच याबाबत लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात येणार असल्याची माहिती दिली़गुंतवणूकीवर जादा व्याजाचे आमिष दाखवून पुणे येथील फडणीस ग्रुपने शहरातील १२८ गुंतवणूकदारांची सुमारे २२ कोटी ८३ लाख रुपयांची फसवणूक केली़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात एमपीआयडीन्वये गुन्हा दाखल असून, आर्थिक गुन्हेशाखेकडून तपास सुरू आहे. ग्रुपचे संचालक विनय फडणीस यांना एप्रिलमध्ये तर अन्य दोन संचालकांना पोलिसांनी अटक केली़ या तपासाबाबत पोलिसांकडून विलंब होत असल्याचा आरोप करून गुंतवणूकदारांनी आयुक्तांच्या भेटीची मागणी केली़पोलीस आयुक्तालयात गुन्हे शाखेची आढावा बैठक सुरू असल्याने आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सावंत यांनी गुंतवणूकदारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली; मात्र समाधान न झाल्याने आयुक्तांची भेट घेण्याची मागणी केली़ सायंकाळी सात वाजेच्या सुमारास आयुक्तांनी भेट घेत त्यांच्या शंकांचे समाधान केले़ यावेळी प्रीतीश कुलकर्णी, राजेंद्र अनंतवार, के. पी. राव, रक्षा गुजराथी, मुकुंद मुंगी, अनुराधा आगाशे, अलका फडके, मंदाकिनी भांड, जयश्री पाटील, विजय पाटील, अनिल कुलकर्णी आदींसह गुंतवणूकदार उपस्थित होते.