शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणूकदाराची ४० लाख २५ हजारांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 23:54 IST

मालेगाव : येथील मुशावरत चौक नयापुरा भागात असलेल्या हिरा गोल्ड व हिरा टेक्सटाइल लि. या शाखेकडून कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना हमखास परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची ४० लाख २५ हजार रुपये रकमेची फसवणूक करणाºया पाच जणांविरुद्ध आझादनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

मालेगाव : येथील मुशावरत चौक नयापुरा भागात असलेल्या हिरा गोल्ड व हिरा टेक्सटाइल लि. या शाखेकडून कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना हमखास परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची ४० लाख २५ हजार रुपये रकमेची फसवणूक करणाºया पाच जणांविरुद्ध आझादनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.शहरातील अंजुमन चौक पवार गल्ली न्यू वॉर्ड येथे लेडिज स्टोअर दुकानदार आदील सुलतान अकील अहमद (२१) यांनी पोलिसात फिर्याद दिली. जून २०१७ ते आजपावेतो ही घटना घडली. हिरा ग्रुप आॅफ कंपनीचे सीईओ नौहेरा शेख, संचालक मुबारकजान शेख, सहायक सीईओ मौली थॉमस, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह अबुजर अन्सारी, दुसरा मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह सलमान अन्सारी दोन्ही रा. सलीम मुन्शीनगर यांनी नयापुरा येथील शाखेत गुंतवणूक करून हमखास परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या गुंतवणूक योजना सांगून त्यामध्ये गुंतवणूक करण्यास प्रेरित केले.फिर्यादी व त्याच्या घरातील लोकांकडून २६ लाख ५० हजार रुपये वेळोवेळी स्वीकारून गुंतवणूक करून घेऊन फिर्यादीस काही प्रमाणात परतावा देऊन पुन्हा अचानक परतावा थांबविला. तसेच फिर्यादीची मुद्दल रक्कम आणि प्रतिमाह परतावा न देता २६ लाख ५० हजारांची फसवणूक केली व फिर्यादी सोबत अन्य आठ गुंतवणूकदारांनी विश्वासाने सोपविलेली एकूण १३ लाख ७५ हजारांची रक्कम अशी एकूण ४० लाख २५ हजारांची गुंतवणूक रक्कम स्वीकारून ती स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वापरून अन्यायाने फिर्यादी व अन्य गुंतवणूकदारांचा विश्वासघात व फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक डी. बी. पारेकर करीत आहेत.