शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

बड्या सराफी व्यावसायिकांची चौकशी

By admin | Updated: January 19, 2017 01:21 IST

तपासणी : नोटाबंदीनंतर सोने विक्रीत वाढ

नाशिक : नोटाबंदीच्या घोषणेनंतर मोठ्या प्रमाणात सोने विक्रीचे व्यवहार केलेल्या राज्यातील सुवर्ण व्यावसायिकांची आयकर विभागाने यादी तयार केली आहे़ यामध्ये नाशिकमधील तीन बड्या सराफी व्यवसायिकांचा समावेश असून, बुधवारी (दि़ १८) दुपारी आयकर विभागाने या सराफी व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये जाऊन सोने विक्री व्यवहाराची चौकशी केली़ यामध्ये तफावत आढळल्यास संबंधित व्यावसायिकावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे़  पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री चलनातील पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा बाद केल्याची घोषणा केली़ या घोषणेनंतर नाशिक शहरातील काही सराफी व्यावसायिकांची दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू होती़ तसेच नोटाबंदीच्या कालावधीत सोने विक्रीत भरमसाठ वाढ झाल्याने सराफी व्यावसायिकांनी ग्राहकांकडून चलनातील जुन्या नोटा स्वीकारून व्यवहार केले वा धनादेशाद्वारे व्यवहार केले याची आयकर विभागाकडून चौकशी सुरू केली होती़ नोटाबंदीच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात सोन्याचे व्यवहार झालेल्या राज्यातील ५४१ सराफी व्यावसायिकांची यादी आयकर विभागाने तयार केली आहे़ आयकर विभागाच्या यादीमध्ये नाशिक शहरातील तीन बड्या सराफी व्यावसायिकांचा  समावेश असून, त्यांच्या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले आहेत़ बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास आयकर विभागाने या दुकानांवर पथक पाठवून त्यांची व्यवहार तपासणी सुरू केली़ या सराफी व्यावसायिकांनी खरेदी केलेले व विक्री केलेले सोने, दुकानात शिल्लक असलेल्या सोन्याची मोजदाद, सोने खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना रोख वा धनादेश यापैकी कशाने केले़ यासाठी जुने चलन किती स्वीकारले, त्यांच्या बँकेचे खाते पुस्तक, व्यवहारांची कसून चौकशी केली जाते आहे़ (प्रतिनिधी)आयकर विभागाने या तिघा सराफी व्यावसायिकांची दुकाने सील केली नसून दुकानातील खरेदी-विक्री व्यवहाराचे दफ्तर ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे़ बुधवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू राहणार असून, सराफी व्यावसायिकांच्या व्यवहारांमध्ये तफावत आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे़ या धडक कारवाईमुळे शहरातील इतर सराफी व्यावसायिकांमध्येही खळबळ उडाली आहे़ दरम्यान, याबाबत सराफी व्यावसायिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही़