नाशिक : इंटरनेटवरील विवाहजुळणी संकेतस्थळावरील वधूचे प्रोफाईल पाहून त्यानुसार संपर्क साधून वधूपित्याची एक लाखाची फ सवणूक तसेच भावी वधूचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी संबंधित तरुणीने अंबड पोलीस ठाण्यात फि र्याद दिली असून, पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत़अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोतील राजीवनगर भागात राहणाऱ्या एका पित्याने विवाहाच्या दृष्टिकोनातून आपल्या एकोणीस वर्षीय मुलीचा प्रोफ ाईल इंटरनेटवरील शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर तयार केला़ हा प्रोफ ाईल पाहून रत्नागिरी येथील संशयित मोमीन लियाकत शेख याने खोटी माहिती देऊन तरुणीच्या आई-वडिलांशी गोड बोलत परिचय वाढवून साखरपुडाही उरकून घेतला़ यानंतर मोमीन शेखने मेहमूद डिंगणकर हे आजोबा, तर खतिजा डिंगणकर या आजी, सोहेल लियाकत शेख व नगमा लियाकत शेख हे भाऊ-बहीण असल्याचे खोटे सांगितले़या पाचही संशयितांनी वधूपित्याकडे लग्नासाठी घाई करून कपडे व येण्या-जाण्याच्या भाड्यासाठी पन्नास हजारांची मागणी करून एक लाख रुपये घेऊन गेले़ तसेच साखरपुड्यानंतर मुलीचा विनयभंग केल्याची फि र्याद संबंधित वधूने अंबड पोलिसांकडे केली आहे़ दरम्यान, या प्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित मोमीन शेख, मेहमूद डिंगणकर, खतिजा डिंगणकर, सोहेल शेख, नगमा शेख यांच्याविरोधात फ सवणूक तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे़ या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वाघ करीत आहेत़ (प्रतिनिधी)