शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सराफी व्यावसायिकांची दुसºया दिवशीही चौकशी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 00:55 IST

नाशिक : पीएनबी बँकेला हजारो कोटींचा गंडा घालणाºया संशयित नीरव मोदी व चोकसी यांच्या ‘गीतांजली’सह इतर ब्रँडची सराफांनी फ्रेंचायसी घेतली असून, त्या सर्वांची आयटी व ईडीच्या पथकाने चौकशी सुुरू केली आहे़ शहरातील कॅनडा कॉर्नरवरील सुराणा ज्वेलर्स, समर्थ नगर येथील द-दमाज व गंगापूर नाक्यावरील आदित्य ज्वेलर्स या तीन सराफी पेढ्यांनी ‘गीतांजली’ ब्रँडची फ्रेंचायसी घेतली असल्याने त्यांनी विक्री केलेले दागिने व आर्थिक व्यवहाराची ईडी व आयटीकडून बुधवार (दि़२१) पासून चौकशी सुरू आहे़ आयटी व ईडीच्या अधिकाºयांकडून गुरुवारी (दि़२२) देखील या तीन सराफी दुकानांची चौकशी सुरू होती़ दरम्यान, या कारवाईमुळे शहरातील इतर सराफी व्यावसायिकांचेही धाबे दणाणले आहे़

ठळक मुद्देछापे हे ईडीने टाकल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली द-दमाज व आदित्य ज्वेलर्स यांची मध्यरात्रीच्या सुमारास चौकशी पूर्ण

नाशिक : पीएनबी बँकेला हजारो कोटींचा गंडा घालणाºया संशयित नीरव मोदी व चोकसी यांच्या ‘गीतांजली’सह इतर ब्रँडची सराफांनी फ्रेंचायसी घेतली असून, त्या सर्वांची आयटी व ईडीच्या पथकाने चौकशी सुुरू केली आहे़ शहरातील कॅनडा कॉर्नरवरील सुराणा ज्वेलर्स, समर्थ नगर येथील द-दमाज व गंगापूर नाक्यावरील आदित्य ज्वेलर्स या तीन सराफी पेढ्यांनी ‘गीतांजली’ ब्रँडची फ्रेंचायसी घेतली असल्याने त्यांनी विक्री केलेले दागिने व आर्थिक व्यवहाराची ईडी व आयटीकडून बुधवार (दि़२१) पासून चौकशी सुरू आहे़ आयटी व ईडीच्या अधिकाºयांकडून गुरुवारी (दि़२२) देखील या तीन सराफी दुकानांची चौकशी सुरू होती़ दरम्यान, या कारवाईमुळे शहरातील इतर सराफी व्यावसायिकांचेही धाबे दणाणले आहे़आयटी व ईडीच्या पथकाने बुधवारी सुराणा ज्वेलर्स, आदित्य ज्वेलर्स व द-दमाज या सराफी पेढ्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली़ या चौकशीसाठी मुंबईहून दोन-तीन इनोव्हा वाहनातून हे अधिकारी नाशिकमध्ये आले आहेत़ दरम्यान, कॅनडा कॉर्नरवरील सुराणा ज्वेलर्स हे सराफी दुकान पूर्ववत सुरू होते तर त्यापाठीमागील दुसºया सुराणा ज्वेलर्स या दुकानाचे शटर अर्धवट उघडे ठेवून अधिकाºयांची चौकशी सुरू होती़ ईडी व आयटीचे अधिकारी या सराफी व्यावसायिकांनी फ्रेंचायसीच्या कालावधीत केलेली दागिन्यांची विक्री, त्यांचे मोदीच्या कंपनीसोबत झालेले आर्थिक व्यवहार याबाबत माहिती घेत होते़सदरचे छापे हे ईडीने टाकल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे़ दरम्यान, द-दमाज व आदित्य ज्वेलर्स यांची मध्यरात्रीच्या सुमारास चौकशी पूर्ण झाली, तर कॅनडा कॉर्नरवरील सुराणा ज्वेलर्सची गुरुवारी सायंकाळपर्यंत चौकशी सुरू होती़