शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ अधिकाऱ्यांच्या चौकशीला हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 01:13 IST

उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशाचे उल्लंघन करत अनधिकृत असलेल्या ‘ग्रीन फिल्ड’ या मिळकतीची भिंत अतिक्रमण निर्मूलन विभागाने पाडली. न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल महापालिकेला न्यायालयाने पुन्हा भिंत बांधावी, असे आदेशित करून एकप्रकारे शिक्षा ठोठावली.

नाशिक : उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशाचे उल्लंघन करत अनधिकृत असलेल्या ‘ग्रीन फिल्ड’ या मिळकतीची भिंत अतिक्रमण निर्मूलन विभागाने पाडली. न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल महापालिकेला न्यायालयाने पुन्हा भिंत बांधावी, असे आदेशित करून एकप्रकारे शिक्षा ठोठावली. यासाठी मनपाला सुमारे १७ लाख रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. या प्रकरणातील दोषी अधिकाºयांच्या नियमानुसार चौकशी करण्याबाबतच्या विषयावर महासभेत काथ्याकूट झाला. अखेर महापौर रंजना भानसी यांनी नियमानुसार चौकशी करण्याचे आदेश दिले.माजी महापौर प्रकाश मते यांच्या मालकीचे ‘ग्रीन फिल्ड’ लॉन्स अनधिकृत असल्याचे महासभेत अधिकाºयांनी पुन्हा स्पष्ट केले. या लॉन्सची संरक्षक भिंत न्यायालयाच्या आदेशान्वये पाडण्याची मोहीम सुरू असतानाच उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश नगररचना विभागाला प्राप्त झाला; मात्र अधिकाºयांमध्ये आपापसांत समन्वयाचा अभाव असल्यामुळे अखेर अतिक्रमण निर्मूलन विभागाने मोहीम ‘फत्ते’ केली. यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान महापालिकेकडून झाला. दरम्यान, याप्रकरणी सुनावणीसाठी अधिकारी उपस्थित न राहिल्यामुळे न्यायालयाने थेट आयुक्त तुकाराम मुंढे यांना पुढील सुनावणीस हजर राहण्याचे फर्मान काढले. मुंढे यांनी सुनावणीदरम्यान प्रशासनाची चूक मान्य करत प्रशासनप्रमुख या नात्याने न्यायालयाची माफी मागितली. यावेळी न्यायालयाने तोडलेली भिंत पुन्हा बांधण्याची ‘शिक्षा’ महापालिका प्रशासनाला सुनावली. याप्रकरणी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, उपआयुक्त (अतिक्रमण) रोहिदास बहिरम, उपमुख्यलेखाधिकारी सुरेखा घोलप, कार्यकारी अभियंता पांडुरंग चव्हाण यांच्यावर जबाबदारी निश्चित करत ठपका ठेवण्यात आला. त्यांची विभागीय चौकशी मुंढे यांनी सुरू केली. सदर विषय पटलावर येताच सभागृहातील सदस्यांनी त्यास चौकशीचा अधिकार महासभेला असल्याचे सांगून आक्षेप घेत ठराव पुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी केली. यावेळी प्रशासन सभागृहातील सदस्यांना साक्षीदार करत असल्याचा आरोपही करण्यात आला. तसेच विभागीय अधिकाºयांनाही दोषी धरण्याची मागरी करण्यात आली. सदस्यांचे म्हणणे ऐकून घेत मुंढे यांनी प्रशासकीय बाजू मांडली. त्यानंतर भानसी यांनी नियमानुसार चौकशी करण्यास मान्यता दिली. यावेळी या प्रस्तावाला विरोध असल्याची बाब नोंद के ली जावी असे शिवसेना, कॉँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक