शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक सायबर पोलीसांचा तपास : अश्लील छायाचित्रांना वापरले महिलेचे छायाचित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 14:55 IST

महिला कर्मचा-याचा चेहरा अश्लील छायाचित्रांना वापरून ती छायाचित्रे व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून संशयिताने व्हायरल केले.

ठळक मुद्देसंशयिताने तब्बल आठ भ्रमणध्वनी क्रमांकाचा वापर केला सोशल मिडिया हाताळताना महिला, युवतींनी विशेष खबरदारी घेण्याची गरज ...तर छायाचित्रांचा गैरवापरही होऊ शकतो,

नाशिक : सोशल मिडियावर छायाचित्रे अपलोड करताना महिलांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. स्वत:ची छायाचित्रे चांगल्या रिझुलेशनची जर असेल तर त्या छायाचित्रांचा गैरवापरही होऊ शकतो, असाच एक धक्कादायक प्रकार शहरात उघडकीस आला आहे. एका अज्ञात व्यक्तीने एका कर्मचारी महिलेच्या छायाचित्रांचा आधार घेत त्या महिलेचा चेहरा अश्लील छायाचित्रांना वापरल्याचे समोर आले आहे.याबाबत सायबर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील एका कार्यालयात नोकरी करणाºया महिलेचे छायाचित्रे सोशल मिडियाच्या माध्यमातून मिळवून संशयिताने त्या छायाचित्रांचा वापर अश्लील छायाचित्रांसाठी केला. महिला कर्मचा-याचा चेहरा अश्लील छायाचित्रांना वापरून ती छायाचित्रे व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून संशयिताने व्हायरल केले. तसेच कार्यालयातील अन्य महिलांच्या भ्रमणध्वनीवरदेखील व्हॉट्सअ‍ॅपद्वारे अश्लील छायाचित्रे पाठविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संशयिताने तब्बल आठ भ्रमणध्वनी क्रमांकाचा वापर यासाठी केला आणि या वेगवेगळ्या भ्रमणध्वनी क्रमांकावरुन पिडित महिलेला शिवीगाळ केली.याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात पिडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन संशयिताविरुध्द गुन्हा दाखल क रण्यात आला आहे. तसेच संशयिताने वापरलेल्या सर्व भ्रमणध्वनी क्र मांकाची माहिती तपासली जात असून पोलीस निरिक्षक राजेंद्र कुटे हे पुढील तपास करत आहेत.सोशल मिडियाचा सतर्कतेने करावा वापरएकूणच सोशल मिडिया हाताळताना महिला, युवतींनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. अनोळखी व्यक्तींसोबत गप्पा, छायाचित्रांची देवाणघेवाणीसह वैयक्तिक माहितीचे आदानप्रदान टाळावे, असे आवाहन पोलिसांकडून वारंवार केले जात आहे. तसेच व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या सोशल माध्यमांचा वापर करताना प्रायव्हसी सेटिंग्समध्ये सुरक्षेसंदर्भाात असलेलल्या बाबी सक्रिय कराव्या. तसेच चांगल्या दर्जाची छायाचित्रे अपलोड करणे टाळावे.

टॅग्स :NashikनाशिकWomenमहिलाcyber crimeसायबर क्राइम