शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बीएलओं  मानधन रकमेच्या  घोटाळ्याची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:59 IST

कागदोपत्री मतदान केंद्रनिहाय बीएलओंची नेमणूक दाखवून त्यांच्या मानधन रकमेच्या घोटाळ्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती गठित केली असून, त्याची सुरुवात मालेगाव तालुक्यातून करण्यात येणार आहे. येत्या महिन्यात यासंदर्भात अंतर्गत लेखापरीक्षकांमार्फत ही चौकशी पूर्ण करण्यात येईल व त्यानंतर सर्वच विधानसभा मतदारसंघांतील बीएलओंच्या मानधनाच्या रकमेची पडताळणी होणार आहे.

नाशिक : कागदोपत्री मतदान केंद्रनिहाय बीएलओंची नेमणूक दाखवून त्यांच्या मानधन रकमेच्या घोटाळ्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती गठित केली असून, त्याची सुरुवात मालेगाव तालुक्यातून करण्यात येणार आहे. येत्या महिन्यात यासंदर्भात अंतर्गत लेखापरीक्षकांमार्फत ही चौकशी पूर्ण करण्यात येईल व त्यानंतर सर्वच विधानसभा मतदारसंघांतील बीएलओंच्या मानधनाच्या रकमेची पडताळणी होणार आहे.  यासंदर्भात सर्वप्रथम ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. निवडणूक आयोगाने एप्रिल महिन्यात मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचे फोटो गोळा करणे व ज्या मतदारांचे कृष्णधवल छायाचित्र आहे त्यांच्याकडून रंगीत फोटो गोळा करण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता. त्याची जबाबदारी मतदान केंद्रनिहाय नेमलेल्या बीएलओंवर सोपविण्यात आली होती. नाशिक जिल्ह्णातील एक लाख १० हजांराहून अधिक मतदारांची छायाचित्रे गोळा करण्याचे काम एक महिन्यात पूर्ण करावयाचे असताना, प्रत्यक्षात फक्त १३ टक्केच काम होऊ शकले. यात जिल्ह्णातील मालेगाव मध्य व बाह्य मतदारसंघातील बीएलओंनी शून्य टक्के काम केल्याचे उघड झाल्यावर अधिक चौकशीअंती हा घोटाळा उघडकीस आला होता. गेल्या दोन वर्षांपासून बीएलओंना दरवर्षी मानधनाची रक्कम त्यांच्या खात्यावर अदा केली जात असताना, मग निवडणूक आयोगाचे कामकाज का होत नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. मालेगावच्या एका निवडणूक कर्मचाºयाने आपल्या नातेवाईक व मित्र-मैत्रिणींना कागदोपत्री बीएलओ दाखवून मानधनाची रक्कम लाटल्याची बाबही समोर आली.घोटाळ्याची दखल घेत, आता बीएलओंच्या मानधनाच्या रकमेचे अंतर्गत लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकायांनी या संदर्भातील आदेश पारित केले असून, त्रिसदस्यीय समितीमार्फत या चौकशीची सुरुवात मालेगाव तालुक्यापासून करण्यात येणार आहे. एका महिन्याच्या आत चौकशी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय