महेश गुजराथी । लोकमत न्यूज नेटवर्कचांदवड : येथील उपजिल्हा रुग्णालयात नवीन चार बॅटरी व इन्व्हर्टर बसविण्यात आले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच वरिष्ठांनी तातडीने दखल घेत रूग्णांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मुंबई-आग्रारोेडवर नेहमीच अपघात होत असल्याने येथे शासनाने सुमारे ७० खाटांचे रुग्णालय दिले; मात्र येथे डॉक्टरांची संख्या अपुरी असून, राज्य शासनाने येथे ट्रामा केअर सेंटर सुरू केले आहे. परंतू येथे यंत्रसामग्री नसल्याने यांची असून अडचण नसून खोळंबा झाल्याचे चित्र दिसत आहे. समस्यांनी या चांदवड उपजिल्हा रुग्णालयाला ग्रासले असून, वरिष्ठ जिल्हा शल्यचिकित्सक, लोकप्रतिनिधींचे या रुग्णालयाकडे दुर्लक्ष असल्याने येथील रुग्णांना सेवा मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून मनमाड येथील डॉ. नरवणे यांच्याकडे वैद्यकीय अधीक्षक म्हणून चांदवड रुग्णालयाचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे. त्यांच्याकडे मनमाड येथील भार असल्याने ते चांदवड येथे आठवड्यातून एक दिवस येतात, त्यामुळे त्यांचे पाहिजे तेवढे लक्ष या उपजिल्हा रुग्णालयाकडे नाही. या रुग्णालयात सद्यस्थितीत मात्र हे डॉक्टर बालरोग तज्ज्ञ असल्याचे समजते. . त्यामुळे या चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयाकडे वरिष्ठांचेही पाहिजे तेवढे लक्ष पहिल्यापासून दिसत नाही. त्यामुळे हे चांदवडचे उपजिल्हा रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.येथील शवविच्छेदन गृहातील सर्वच दरवाजे व खिडक्या या तुटल्या असून, येथे शव ठेवल्यानंतर त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. या रूग्णालयाचा नागरिकांना उपयोग होत नसल्याने वरिष्ठांनी त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी होत असून, कायमस्वरूपी निवासी वैद्यकीय अधीक्षक नेमावे अशी मागणी होत आहे. आता बॅटरी इन्व्हर्टर मिळाले; मात्र अजूनही डॉक्टरांची संख्या वाढवून मिळावी, चांदवड येथील ट्रामा केअर सेंटरला सर्व यंत्रसामग्री देऊन ते त्वरित सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
रुग्णालयात इन्व्हर्टर
By admin | Updated: July 17, 2017 00:39 IST