शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुलाखतीतून भाजपचे चित्र होणार स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 01:46 IST

आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती होणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत असले तरी, बुधवारी नाशिक जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचे भारतीय जनता पक्षाने ठरविले असून, त्यादृष्टीने इच्छुकांनी ‘होमवर्क’ करायला सुरुवात केली आहे.

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती होणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत असले तरी, बुधवारी नाशिक जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचे भारतीय जनता पक्षाने ठरविले असून, त्यादृष्टीने इच्छुकांनी ‘होमवर्क’ करायला सुरुवात केली आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, पक्षाकडून इच्छुक असलेल्या प्रत्येकालाच ‘आमदारकीची’ स्वप्ने पडत असल्याने या मुलाखतीच्या निमित्ताने पक्षाबरोबरच इच्छुकांनाही मतदार-संघातील स्वपक्षीय प्रतिस्पर्ध्यांचे चित्र स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती न करता जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघांत भारतीय जनता पक्षाने उमेदवार उभे केले असता, त्यातील चार उमेदवार निवडून आले आहेत. या चारमध्ये तीन आमदार एकट्या नाशिक शहरातील असून, एक जागा चांदवड मतदारसंघातील पटकावली आहे. मात्र गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलली. एवढेच नव्हे तर लोकसभा निवडणुकीत युतीने जिल्ह्णातील दोन्ही जागा जिंकल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या अपेक्षा अधिक उंचावल्या असल्या तरी, राजकीय नेत्यांच्या पक्षांतरात भारतीय जनता पक्षाच्या वाट्यास जिल्ह्णातून फारसे काही हाती लागलेले नाही. अशा परिस्थितीतही भाजपकडून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची संख्या अधिक असून, युतीच्या जागा वाटपात सेनेच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघातूनही भाजपा इच्छुकांची संख्या अधिक आहे. तर भाजपाच्याच ताब्यात असलेल्या मतदारसंघातही चार ते पाच इच्छुक तयार आहेत. परिणामी उमेदवारी देताना इच्छुकांबरोबर पक्षश्रेष्ठींचीही कसोटी लागणार आहे. निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वीच इच्छुकांकडून विद्यमान आमदारांच्या कामकाजाविषयी असमाधान व्यक्त करून स्वत:ची दावेदावी दामटण्यास सुरुवात झाली आहे.पक्षाने येत्या बुधवारी नाशिक जिल्ह्यातील सर्वच्या सर्व पंधरा विधानसभा मतदारसंघांत उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी इच्छुकांनी मुलाखतीची तयारी सुरू केली असून, प्रतिस्पर्ध्यावर लक्ष ठेवून आहेत. शिवसेनेबरोबर युती करून भाजप निवडणूक लढविणार असल्याने पंधरा मतदारसंघात इच्छुकांची चाचपणी का? असा सवाल शिवसेनेनेही उपस्थित करण्यास सुरुवात केली असून, भाजपच्या मुलाखतीतून खऱ्या अर्थाने मतदारसंघनिहाय इच्छुकांची संख्या व जागावाटपात संभाव्य मतदारसंघ सुटण्याविषयीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाElectionनिवडणूक