शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

नाशकात आंतरराष्ट्रीय योग दिन डिजिटल पद्धतीने साजरा ; शैक्षणिक संस्थांचाही ऑनलाईन सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 19:06 IST

नाशिककरांनी  रविवारी (दि.२१)आपआपल्या घरातच विविध प्रकारची योगासने करून आंतराराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत सूर्यनमस्कार, ताडासान, कपालभाती सारख्या विविध आसनांची प्रात्यिक्षिके केली. या माध्यमातून करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिन डिजिटली साजरा करण्याच्या सरकारच्या आवाहनाला नाशिककरांनी  रविवारी (दि.२१) उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

ठळक मुद्देनाशिकमध्ये वेबलिंकद्वारे योगासनांचे धडे ऑनलाईन मार्गदर्शनानुसार योगाभ्यासकांची प्रात्यक्षिके

नाशिक : करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिन डिजिटली साजरा करण्याच्या सरकारच्या आवाहनाला नाशिककरांनी  रविवारी (दि.२१) उत्स्फूर्त प्रतिसाद देतआपआपल्या घरातच विविध प्रकारची योगासने करून प्रतिसाद दिला. तर विविध व्यायाम शाळा आणि योग प्रशिक्षण वर्गांच्या माध्यमातून सोशल डिस्टंन्सींगचे पालन करून आंतराराष्ट्रीय योग दिनाचे औचित्यसाधत सूर्यनमस्कार, ताडासान, कपालभाती सारख्या विविध आसनांची प्रात्यिक्षिके करून घेतली.करोनामुळे मोठ्या संख्येने एकत्र येणे शक्य होणार नसल्याने लोकांनी ‘सोशल मीडिया’तून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. जिल्हा क्रीडा विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन योगाभ्यास शिबीरात जिल्हा भरातील क्रीडा शिक्षकांनी सहभागी होत वेगवेगळया योगासनांची प्रात्यक्षिक केली. यात जिल्हाभरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याचे दिसून आले. तर काही शिक्षण संस्थांनी स्वतंत्र वेबलिंकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योगासानांचे धडे दिले. त्याचप्रमाणे महानगरपालिका,  जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्तालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, विभागीय आयुक्तलाय आदी विविध कार्यालयातील प्रमुख अधिकाºयांनीही घरीच राहून योगाभ्यास केला. अनेक योगाभ्यासकांनी त्यांनी केलेल्या योगासनांचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल केले असून यंदा एकत्र येण्यावर निर्बंध असल्याने एकत्र योग दिनाच्या उत्साहात कोणत्याही प्रकारे घट झाल्याचे जाणवले नाही. दरम्यान, शहरात आंतराष्ट्रीय योग दिवसासाठी ‘योग घरी आणि योग कुटुंबासोबत’ अशी संकल्पना मांडण्यात आली होती. त्यामुळे रविवारी (दि.२१) सकाळी ७ वाजल्यापासून ‘सोशल मीडिया’तून अनेक नाशिकरांनी विविध ठिकाणी आयोजित ऑनलाईन योग शिबिरांमध्ये सहभाग नोंदवला.  डिजिटल माध्यमांमध्ये अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे,यासाठी शहरातील वेगवेगळ्योग प्रशिक्षण संस्थांनी गेल्या आठवड्याभरापासूनच प्रचार प्रसाराची मोहीम हाती घेतली होती. विशेष म्हणजे अशा प्रकारे ऑनलाईन शिबिरांमध्ये काही परदेशातील योगाभ्यासकांनी सहभाग नोंदविल्याचे दिसून आले.  

मुक्त विद्यापीठात योगासानांविषयी मार्गदर्शन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून योगासानांविषयी मार्गदर्शनपर ऑनलाईन व्याख्यान व प्रात्यक्षिकांच सादरीकरण करण्यात आले. विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने हा योगदिन साजरा केला. यावेळी कुलगुरू प्रा ई. वायूनंदन ,आरोग्य विज्ञान विद्यशाखेचे संचालक डॉ. जयदीप निकम यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. विविध विद्याशाखांचे संचालक व इतर कर्मचारी अशा ५० योगाभ्यासकांनी या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते. योगतज्ज्ञ मोकळ यांनी प्रात्यक्षिक सराव सादर करून घेतला. 

टॅग्स :International Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिनNashikनाशिकuniversityविद्यापीठ