शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
3
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
4
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
5
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
8
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
9
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
10
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
11
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
12
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
13
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
14
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
17
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
18
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
19
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
20
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले

जिंदाल कंपनीत बाहेरील लोकांचा हस्तक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 16:25 IST

अधिकाऱ्यांचा आरोप : स्थानिकांना कंपनीचे सहकार्यच

ठळक मुद्देवर्षभरात जिंदालशी संबंधित नसलेले अनेक विषय घेऊन मोर्चे, निवेदने देऊन कंपनीचे खच्चीकरण करण्याचे हे कारस्थान आहे. कंपनीकडून नेहमीच रास्त मागण्यांबाबत सकारात्मक पाऊल उचलण्यात आले असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

घोटी : इगतपुरी तालुक्यातील शेकडो कुटुंबांना शाश्वत रोजगार पुरवत प्रकल्पग्रस्त, स्थानिक युवक, कामगार यांना वेळोवेळी सौजन्य करणा-या जिंदाल कंपनीत बाहेरील काही लोकांकडून अंतर्गत बाबींत मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप करण्याचे प्रकार वाढले असल्याचा आरोप मुंढेगाव ता. इगतपुरी येथील जिंदाल कंपनीच्या अधिका-यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे.जिंदालचे अधिकारी संजय माथूर यांनी सांगितले, शासनाच्या निर्देशानुसार यापूर्वी शेकडो प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक नागरिकांना कामावर घेण्यात आलेले असून याबाबतची उर्वरित प्रक्रि या प्रगतीपथावर आहे. मुंढेगाव येथील स्थानिक, प्रकल्पग्रस्त युवकांना त्यांच्या कौशल्यावर आधारित कंपनीने परिपूर्ण रोजगार देण्याचा शब्दही पूर्ण केला आहे. काही बाबी तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित असल्या तरी त्या लवकरच पूर्णत्वाकडे जातील. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून जिंदाल कंपनीशी संबंधित नसलेल्या लोकांकडून अंतर्गत बाबींमध्ये मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप वाढला आहे. परिसरातील काही लोकांना हाताशी धरून काही लोक चांगल्या कामांत खोडा घालत आहेत. वर्षभरात जिंदालशी संबंधित नसलेले अनेक विषय घेऊन मोर्चे, निवेदने देऊन कंपनीचे खच्चीकरण करण्याचे हे कारस्थान आहे. कंपनीकडून नेहमीच रास्त मागण्यांबाबत सकारात्मक पाऊल उचलण्यात आले असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. इगतपुरी तालुक्यातील स्थानिक नागरिकांनी जिंदाल कंपनीला सहकार्य केल्यास आगामी काळात अधिकाधिक चांगले काम निश्चितपणे करता येणे शक्य आहे, असेही जिंदालचे अधिकारी संजय माथूर, तारक बॅनर्जी यांनी शेवटी सांगितले.अनाठायी मागणीजिंदाल कंपनीत काम करणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांना निवासी व्यवस्था पुरवतांना मूलभूत सुविधा आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ह्या बाजारपेठेला बंद करून कंपनीबाहेरील व्यावसायिकांकडून साहित्य घ्यावे अशी अनाठायी मागणी आहे. कंपनीचे काम करणा-या लोकांना निवासी भागातच अत्यावश्यक सुविधा देणे हे आमचे कर्तव्य आहे. कंपनी बाहेरील स्थानिक व्यावसायिकांना पथदीप आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मानवतेच्या दृष्टीने करून देण्यात आलेली असून संबंधितांची विजेची जोडणी, शॉप अ‍ॅक्ट परवानगी वगैरे विषय जिंदालशी संबंधित नसल्याचेही माथूर आणि बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :NashikनाशिकJindal Companyजिंदाल कंपनी