शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

..शेतकरी अडकला कायद्याच्या कचाट्यात

By admin | Updated: February 9, 2016 22:43 IST

नांदगाव : तलावातला गाळ शेतापर्यंत नेताना प्रांताधिकाऱ्यांनी केली कारवाई

 संजीव धामणे नांदगावनांदगाव तालुक्यातील भौरी येथील काही शेतकरी कोरड्या पडलेल्या पाझर तलावातील गाळ ट्रॅक्टरमधून शेतात वाहून नेत असताना प्रांताधिकारी वासंती माळी यांनी त्यांचे म्हणणे अवैध ठरवत त्यांच्यावर कारवाई केली आहे. एकीकडे गाळ वाहून शेतात टाकण्यासाठी शासन प्रोत्साहनपर योजना राबवीत असताना दुसरीकडे मात्र तांत्रिक कारणांचा बागुलबुवा करून शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात येत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.दोन वर्षे आधी शासनाने स्वखर्चाने दहेगाव धरण व इतरत्रचा गाळ, महात्मा फुले योजनेंतर्गत शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला होता. सुमारे ५० हजार ट्रॅक्टर्स गाळ त्यावेळी शेतांमध्ये पडला. मातीचा पोत सुधारण्यासाठी व पिकांचा कस वाढण्यासाठी त्याची मदत झालीच. पण पाणी साठवण्याची क्षमतासुद्धा वाढली. गाळ काढल्याची नोंद व प्रशंसा महसूल आयुक्त पातळीवर करण्यात आली होती. दरम्यान, दि. २२ जानेवारी २०१४ रोजी उपसचिव डॉ. मलीनाथ कलशेट्टी यांनी एक पत्र जारी केले. त्या पत्रामध्ये पंचायत क्षेत्र विस्तार कायदा १९९६नुसार गौणपाणी साठ्यांचे हस्तांतरण ग्रामपंचायतीं-कडे करणे व त्याचे व्यवस्थापन ग्रामसभेच्या निर्णयाप्रमाणे ग्रामपंचायतीने करणेबाबतचा मजकूर आहे. त्या अनुसार १०० हेक्टरच्या आत सिंचन क्षमता असलेले पाणी साठे पंचायतींकडे वर्ग करणेची कारवाई करण्यात आली. पाण्याचा वापर, देखभाल दुरुस्ती, पाण्यात मत्स्यबीज सोडणे, माशाचा लिलाव करणे या बाबी ग्रामसभेच्या पर्यायाने ग्रामपंचायतींच्या अधिकारकक्षेत आल्या. एकंदरित पाणीसाठा व्यावहारिक पद्धतीने वापरण्याचे व तलावासंदर्भातील इतर अधिकार ही ग्रामपंचायतींकडे देण्यात आले. परंतु पाणी संपले तर गाळाचे काय करायचे? गौण पाणीसाठ्याच्या तळाशी साचणाऱ्या गाळावर नैसर्गिकरीत्या ग्रामपंचायतीचा अधिकार पोहोचतो. असा अर्थ लावून भौरी ग्रामपंचायतीने कोरड्या पडलेल्या तलावातला गाळ शेतामध्ये वाहून नेण्याची शेतकऱ्यांना परवानगी दिली. तो गाळ वाहून नेणारे ट्रॅक्टर्स प्रांताधिकाऱ्यांनी पकडले. विशेष म्हणजे प्रांत माळी यांना शेतकऱ्यांनी शेतात टाकलेला गाळ दाखवला. ग्रामपंचायतीने ग्रामसभेत गाळ वाहून नेण्याचा ठराव केल्याची माहिती सरपंच दत्तात्रय भिलोरे यांनी दिली आहे. एकीकडे कोट्यवधी रुपये खर्चून धरणांमधला गाळ उपसण्याचे प्रयत्न करणारे सरकार आणि दुसरीकडे शासनाच्या पत्रान्वये शेतकरी हिताचा निर्णय घेणारी भौरी ग्रामपंचायत. या दोहोंमध्ये गौण खनिज कायद्याचा भंग केला म्हणून आधीच निसर्ग अवकृपेच्या गाळात रुतलेला शेतकरी अधिक गाळात गेला. तलाठी रवींद्र लोंढे व मंडल अधिकारी अशोक शिलावट यांनी गौण खनिजाची चोरी या नियमान्वये पोलिसांत फिर्याद केली आहे. दरम्यान, शासकीय यंत्रणेतील कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांनीसुद्धा सदर गाळ शेतीसाठीच नेण्यात येत होता या विधानाची पुष्टी केली आहे.नांदगाव शहरात शाकांबरी नदीपात्रात स्मशानभूमीजवळ बिनदिक्कत विटांच्या भट्ट्या सुरू आहेत. या भट्ट्यांमध्ये वापरण्यात येणारी गाळसदृश माती व तत्सम बाबी सर्रास गौण खनिज कायद्याचे उल्लंघन आहे. त्यातून निघणारा विषारी धूर नांदगावकरांचे आरोग्यास घातक ठरत आहे. तसेच भूगर्भातील जलप्रदूषित करत आहे. तहसीलदार अनिल गवांदे व प्रांत माळी त्यांचेवर कारवाई करण्याची हिंमत दाखवतील का, असा प्रश्न शेतकरी करत आहेत. अनुषंगिक स्थितींमध्ये प्रांत माळी यांनी या विभागाची सूत्रे हाती घेतल्यापासून किती वीट भट्ट्यांवर कारवाई केली हा संशोधनाचा विषय आहे.