शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

खासगी जागेवरील अतिक्रमण काढण्यात स्वारस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 00:05 IST

महापालिकेच्या अनेक मिळकतींवर बेकायदेशीर बांधकामे होत आहेत. मात्र त्यात लक्ष घालून कारवाई न करता अतिक्रमण विभाग भलत्याच ठिकाणी कारवाई करून हात ओले करून घेत असल्याची गंभीर तक्रार करण्यात आली आहे.

नाशिक : महापालिकेच्या अनेक मिळकतींवर बेकायदेशीर बांधकामे होत आहेत. मात्र त्यात लक्ष घालून कारवाई न करता अतिक्रमण विभाग भलत्याच ठिकाणी कारवाई करून हात ओले करून घेत असल्याची गंभीर तक्रार करण्यात आली आहे. जेलरोड येथील दोघा भावांच्या वादात विकलेल्या मिळकतीतील मूर्ती बनविण्याचा कारखाना हटविण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने एकदा नव्हे तर दोनदा बुलडोझर चालवला असून, त्यानिमित्ताने भूमाफियांना मदत करण्यात आली आणि विरोध करणाऱ्या मिळकतधारकावरच सरकारी कामात अडथळे आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी संतोष शहरकर यांनी केली आहे.विशेष म्हणजे शहरकर यांनी तक्रार केल्यानंतर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असताना दुसऱ्यांदा पुन्हा कारवाई का केली याचे कारण देण्याऐवजी अतिक्रमण विभागातील अधिकारी जुनेच न्यायालयाचे आदेश दाखवत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.मौजे दसक येथे शहरकर यांच्या मिळकतीसंदर्भात त्यांच्या भाऊबंदकीत वाद सुरू आहे. यासंदर्भात प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. ज्या जागेसंदर्भात वाद आहे, त्यावर संतोष शहरकर मूर्ती घडविण्याचे काम २००७ पासून करतात. आपसात सुरू असलेल्या वादानंतर महापालिकेने याठिकाणी एकदा कारवाई करून त्यांचे मूर्तीचे शेड हटविण्यास सांगितले. त्यानंतर सदरचे शेड शहरकर यांनी स्वत:हून हटविले. यासंदर्भात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या सूचनेनुसार त्यांनी जाबजबाब लिहून दिले. हा प्रकार झाल्यानंतर शहरकर यांच्या बंधूंनी ती जागा अन्य एका राजकीय व्यक्ती आणि अन्य तीन जणांना परस्पर विकली. त्यासंदर्भातदेखील वाद न्यायालयात दाखल असताना ३० नोव्हेंबर रोजी महापालिकेच्या नाशिकरोड विभागाचे विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने याठिकाणी येऊन कारखान्याचे शेड काढण्यास सांगितले. त्यावेळी शहरकर हे नातलगाच्या लग्नाच्या निमित्ताने बाहेरगावी गेले होते. त्यांना कारागिरांनी हा प्रकार कळविल्यानंतर ते धावपळ करीत कारखान्यावर पोहोचले. सदरचे प्रकरण मुळातच न्यायप्रविष्ट असून महापालिकेने एकदा कारवाई केल्यानंतर आता संबंध येत नसल्याचे सांगितल्यानंतर अतिक्रमण विभागाने शहरकर आणि त्यांच्या पत्नीला पोलीस ठाण्यात डांबून ठेवले, असेही निवेदनात नमूद केले आहे.न्यायालयाच्या आदेशाचा बहाणासदरच्या कारवाईच्या आधीदेखील मनपाच्या कर्मचाºयांनी शेड हटविण्यास सांगितले. तेव्हा शहरकर यांनी मनपात येऊन उपआयुक्तांची भेट घेतली. त्यावेळी प्रभारी अतिक्रमण उपआयुक्तांनी न्यायालयाच्या आदेशानुसार एकदा कारवाई झाली आणि पुन्हा कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगितले होते, मात्र त्यानंतरदेखील महापालिकेने कारवाई केल्याने या मागे भ्रष्टाचाराचा संशय शहरकर यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEnchroachmentअतिक्रमण