शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

स्वेच्छेने रस्ता रुंदीकरणासाठी शहरातील २००८ मिळकतधारक इच्छुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 00:45 IST

शहरातील कपाट कोंडी फोडण्यासाठी महापालिकेच्या वतीने सहा व साडेसात मीटर रुंदीचे रस्ते नऊ मीटर करण्यासाठी जागा मालकांनाच विशेषाधिकारात आवाहन करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून, २००८ प्रकरणे दाखल झाली आहेत. त्यातील दोनशे प्रकरणांत तर महापालिकेच्या ताब्यात जागादेखील आल्या आहेत.

नाशिक : शहरातील कपाट कोंडी फोडण्यासाठी महापालिकेच्या वतीने सहा व साडेसात मीटर रुंदीचे रस्ते नऊ मीटर करण्यासाठी जागा मालकांनाच विशेषाधिकारात आवाहन करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून, २००८ प्रकरणे दाखल झाली आहेत. त्यातील दोनशे प्रकरणांत तर महापालिकेच्या ताब्यात जागादेखील आल्या आहेत.शहरातील इमारती बांधताना काही विकासकांनी कपाटाच्या जागा सदनिकेत समाविष्ट करून मुक्त चटई क्षेत्राच्या जागा विकल्याचे प्रकरण उघड झाले होते. त्यामुळे शेकडो इमारतींचे पूर्णत्वाचे दाखले अडकले होते. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून हे प्रकरण महापालिकेत गाजत असून, शासनाकडूनदेखील सुरुवातीला त्याची बोळवण केली होती. मात्र नंतर दिघे येथील बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्यासाठी शासनाने राज्यस्तरावर कंपाउंडिंग योजना आणल्याने नाशिकमधील विकासकांना त्याचा लाभ मिळाला आहे. दरम्यान, कपाट कोंडी फोडण्यासाठी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नगररचना अधिनियमातील विशेषाधिकाराचा वापर करून कलम २१० अन्वये सहा आणि साडेसात मीटर रस्ते रुंद करण्यासाठी अधिसूचना काढली होती. त्यानुसार कमी रुंदीच्या रस्त्यालगतचे जे मिळकधारक किमान नऊ मीटरचा रस्ता देण्यासाठीजागा देतील त्यांना त्या प्रमाणात अतिरिक्त एफएसआय देण्यात येणार आहे.कंपाउंडिंगमधील प्रकरणे वेगळीचसहा आणि साडेसात मीटर रस्ते रुंदीकरणाचे कंपाउंडिंगमधील प्रकरणे वेगळी असून, त्या व्यतिरिक्त २००८ प्रकरणे दाखल आहेत. कंपाउंडिंगमधील प्रकरणांचा विचार केला तर अडीच हजारापेक्षा अधिक प्रकरणात महापालिकेला रस्त्यासाठी चटई क्षेत्राची जागा मिळणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाroad transportरस्ते वाहतूक