शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे पोर्टल सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:10 IST

आंतरजिल्हा बदलीने बदलून जाऊ पाहणारे अथवा नाशिक जिल्ह्णात बदली करून घेण्यास उत्सुक असलेल्या शिक्षकांसाठी राज्य सरकारने आॅनलाइन पोर्टल सुरू केले असून, बदली पात्र शिक्षकांसाठी दि. १० फेब्रुवारीपर्यंत सदरची सुविधा सुरू राहणार आहे.

ठळक मुद्देसरकारचा उपक्रम : अर्ज भरून देण्याची सुविधा

नाशिक : आंतरजिल्हा बदलीने बदलून जाऊ पाहणारे अथवा नाशिक जिल्ह्णात बदली करून घेण्यास उत्सुक असलेल्या शिक्षकांसाठी राज्य सरकारने आॅनलाइन पोर्टल सुरू केले असून, बदली पात्र शिक्षकांसाठी दि. १० फेब्रुवारीपर्यंत सदरची सुविधा सुरू राहणार आहे.राज्याच्या ग्रामविकास विभागाने २०१७ पासून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्यांमध्ये चालणारा गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षकांच्या बदल्या आॅनलाइन करण्यास सुरुवात केली असून, त्यात आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांचाही समावेश करण्यात आला आहे.यंदादेखील शासनाकडून तिच पद्धती अवलंबली जाणार असल्याने त्याची सुरुवात आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांपासून करण्यात आली आहे. त्यासाठी दि.१९ जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान शिक्षकांना अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.अशा बदल्यांमध्ये मात्र १० टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्त असल्यास त्या जिल्हा परिषदेतून शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने बाहेर जाता येणार नाही. यापूर्वी आंतरजिल्हा बदलीसाठी भरलेले अर्ज डिलिट करण्यात आलेले असून, ज्या शिक्षकांना बदली हवी असल्यास त्यांनी नव्याने अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे.बदल्यातील गैरप्रकारांना थारा नाहीआॅनलाइन बदल्यांमुळे बदलीपात्र झालेल्या शिक्षकांना त्यांच्या सोयीनुसार समुपदेशाने बदली केली जाते. त्यासाठी सर्व शिक्षकांची माहिती अगोदर त्यात भरली जाते व जे शिक्षक बदलीसाठी पात्र ठरू शकतात अशांच्याच बदल्यांना मुभा असते. त्यामुळे बदल्यांमध्ये मनमानी अथवा गैरप्रकाराला कुठलाही थारा मिळत नाही.

टॅग्स :Teacherशिक्षक