नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांतर्गत आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अनुदानाचे १६३ जोडप्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सभापती उषा बच्छाव यांच्या हस्ते व समिती सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आले.समाजकल्याण समितीच्या बैठकीत सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर योजनेसाठी एकूण १६३ प्रस्ताव प्राप्त झाले होते. या जोडप्यांना प्रत्येकी पाच हजारांच्या निधीचे धनादेश या बैठकीत वाटप करण्यात आले. एकूण ८१ लाख ५० हजारांचे वाटप करण्यात आले. समितीच्या बैठकीत अनुदान मंजूर झालेल्या एका लाभार्थ्यास प्रातिनिधिक स्वरूपात सभापती उषाताई बच्छाव यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी समिती सदस्य बंडू गांगुर्डे, सुभाष गांगुर्डे, निर्मला गिते, साईनाथ मोरे, अर्जुन मेंगाळ, अनिता जाधव, इंदूबाई गवळी, शीतल कडाळे, संगीता काटे, प्रभारी सचिव यु. के. पवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आंतरजातीय विवाह अनुदानाचे वाटप
By admin | Updated: May 17, 2016 22:36 IST