शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

मुस्लिम कब्रस्तानांमध्येही जागा पडतेय अपुरी...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:15 IST

------ नाशिक : शहरामध्ये अमरधामपाठोपाठ आता मुस्लिम कबरस्तानांमध्येसुद्धा दफनविधीसाठी जागा अपुरी पडू लागली आहे. आठवडाभरापासून कोरोनामुळे मुस्लिम ...

------

नाशिक : शहरामध्ये अमरधामपाठोपाठ आता मुस्लिम कबरस्तानांमध्येसुद्धा दफनविधीसाठी जागा अपुरी पडू लागली आहे. आठवडाभरापासून कोरोनामुळे मुस्लिम समुदायातील मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. दिवसाला कमीत कमी पाच तर जास्तीत जास्त दहा कबरी एका कबरस्तानमध्ये खोदाव्या लागत असल्याचे कबर खोदणाऱ्या मजुरांकडून सांगितले जात आहे. गेल्या पंधरवड्यात सुमारे ६८ लोक मृत्युमुखी पडले आहेत. त्यापैकी किमान ४५ ते ५० लोक हे कोरोनाचे बळी ठरल्याचे धक्कादायक चित्र आहे.

शहरात मुस्लिम समाजाच्या ज्या जुन्या पारंपरिक दफनभूमी (कबरस्तान) आहेत, त्यांची क्षमता आता पूर्णपणे संपुष्टात आली आहे. नव्याने कबर खोदायची तर नेमकी कोठे किंवा सर्वांत जुनी कबर कोणती असेल याचा संपूर्ण कब्रस्तानमध्ये शोध घ्यावा लागतो. मृतदेहांच्या दफनविधीसाठी जागा अपुरी पडू लागल्याने दफनविधीलाही विलंब होत आहे. महापालिका प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून वडाळा गावात मुस्लिम कब्रस्तानसाठी आरक्षित असलेली जागा ताब्यात घेत तेथे दफनविधी सुरू करण्यास शहर ए खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या सुन्नी मरकजी सरत समितीला परवानगी द्यावी, अशी मागणी समुदायाकडून जोर धरू लागली आहे. कारण जे पारंपरिक कब्रस्तान आहेत, ते खासगी विश्वस्त संस्थेच्या अखत्यारीतील आहे. मनपाने आतापर्यंत शहारात मुस्लिम समुदायाला दफनविधीसाठी जागा उपलब्ध करून दिलेली नाही. काही दिवसांपूर्वी महापौर सतीश कुलकर्णी यांनी वडाळा गावातील आरक्षित जागा मनपाला हस्तांतरण करण्यासाठी ६० कोटी रुपयांची तरतूद काही महिन्यांपूर्वी केली आहे. त्यानुसार कोरोनाचे संकट लक्षात घेता तातडीने मनपा प्रशासनाने हा प्रश्न मार्गी लावून मुस्लिम समुदायाला दिलासा देण्याची मागणी खतीब ए शहर हिसामुद्दीन अशरफी यांच्यासह प्रमुख धर्मगुरू, उलेमा आणि विविध धार्मिक, सामाजिक संघटनांनी केली आहे.

-------

इन्फो

दररोज दहापेक्षा जास्त मृत्यू

मुस्लिमबहुल भाग असलेल्या वडाळा गाव, जुने नाशिक, पखाल रोड, आदी भागांत दररोज पाचपेक्षा जास्त मृत्यू होऊ लागले आहेत. मंगळवारी केवळ जहांगीर कब्रस्तानमध्ये संध्याकाळपर्यंत आठ ते दहा कबरी खोदण्यात आल्याचे कब्रस्तान सेवक फिरोज शेख यांनी सांगितले. पंधरवड्यात सुमारे ७० मृतदेहांचा शहरातील जुन्या नाशकातील जहांगीर, रसुलबाग, वडाळ्यातील गौसिया आणि आडगावयेथील कब्रस्तानांमध्ये दफनविधी करण्यात आल्याचे मृतांचा अखेरचा प्रवास सुखकर करण्यासाठी झटणारे सामजिक कार्यकर्ते रिजवान खान यांनी सांगितले. आतापर्यंत अंदाजे ४५ पेक्षा अधिक लोकांचा आठवड्यात कोरोनाने मृत्यू झाल्याचे खान म्हणाले.

----इन्फो---

अत्यावश्यक साधनांची वानवा

मनपाकडून मूलभुत साधनांचा पुरवठा होत नसल्याने जे लोक मृतांच्या अखेरचा प्रवास सुखकर करण्यासाठी अहोरात्र झटत आहे त्यांचाही जीव धोक्यात सापडला आहे. कुठल्याही कब्रस्तानमध्ये संबंधितांना सोडियम हायपोक्लाराईड, हातमोजे, मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट वगैरे मनपाकडून यावर्षी उपलब्ध करून दिले जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे. मृत्यूची नोंद करण्यासाठी लागणारा नमुना अर्जाचाही तुटवडा भासत असून झेरॉक्स दुकाने बंद असल्याने त्या नमुना अर्जाच्या सत्यप्रती मिळविणेही अवघड झाले आहे. त्याचा परिणाम थेट नोंदींवर होताना दिसत आहे.