शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

राष्टÑवादीच्या इच्छुकांना कामाला लागण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 01:11 IST

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा जाणून घेतानाच विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना इच्छुकांना केल्या. जिल्ह्यातील पंधरा पैकी तेरा जागांवर राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी दावा सांगितला आहे.

ठळक मुद्दे लोकसभेच्या पराभवाची कारणमीमांसा

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा जाणून घेतानाच विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना इच्छुकांना केल्या. जिल्ह्यातील पंधरा पैकी तेरा जागांवर राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी दावा सांगितला आहे.राष्टÑवादी कॉँग्रेसने विभागीय बैठकांचे मुंबईत आयोजन करून पक्षाच्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून, शुक्रवारी नाशिक जिल्ह्याचा आढावा पक्ष पदाधिकाऱ्यांनी सादर केला. त्यात प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागांवर झालेल्या पराभवाची चर्चा व कारणमीमांसा करण्यात आली. विद्यमान सरकारच्या विरोधात जनतेत रोष असल्याने त्याचा राजकीय लाभ निवडणुकीत होण्याची शक्यता होती. त्यासाठी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीदेखील अहोरात्र मेहनत घेतली, परंतु दुर्दैवाने यश मिळू शकले नाही.देशपातळीवर सर्वच राजकीय पक्षांची परिस्थिती अशीच झाल्याने नाशिकमध्येदेखील त्यापेक्षा वेगळे चित्र नाही. मात्र गेल्या पंचवार्षिकला विधानसभा मतदार संघनिहाय पक्षाला मिळालेली मते व यंदाच्या मतांमध्ये मोठी तफावत निर्माण झाल्याने पक्षाने त्याचाही विचार करून विधानसभेची तयारी करावी, अशा सूचनाही करण्यात आल्या.पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत विधानसभा मतदार संघनिहाय इच्छुकांची नावेही विचारण्यात आली. त्यात जिल्ह्यातील अनेकांनी निवडणूक लढविण्याची इच्छा प्रदर्शित केल्याने पक्षाने त्यांच्या नावाची नोंद करून आत्तापासूनच मतदारसंघात कामाला लागण्याच्या सूचना केल्या. पक्ष पदाधिकाऱ्यांच्या भावनांची दखल घेत कॉँग्रेसशी जागा वाटपाच्या बोलणीत त्याबाबत विचार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.बैठकीस जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, अर्जुन टिळे, माजी आमदार जयंत जाधव, माजी खासदार देवीदास पिंगळे, हिरामण खोसकर, विष्णुपंत म्हैसधुणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, येवला, नांदगाव, चांदवड, कळवण, सिन्नर, मालेगाव मध्य, बागलाण, नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम व देवळाली या तेरा विधानसभा मतदारसंघांत पक्षाचे वर्चस्व पाहता, येत्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसकडून सदरच्या जागा सोडून घेण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस