शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
2
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
3
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
4
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
5
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
6
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
7
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
8
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
9
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
10
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
11
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
12
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
13
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
14
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
15
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
16
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
17
आपण जंगलाला आग लावली, पूर गावात बोलावला!
18
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
19
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
20
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट

‘सुखोई’ग्रस्त शेतीचे फेरपंचनामे करण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 00:36 IST

नाशिक : सव्वादोन महिन्यांपूर्वी तांत्रिक चाचणी घेताना कोसळलेल्या एचएएलच्या सुखोई विमानामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची घोषणा शासनाने केली असली तरी, त्याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. शासनाने एचएएलकडून भरपाई मागण्याचे ठरविले असल्याने शेतकºयांच्या नुकसानीचा आकडा ठरविण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षकांना फेरपंचनाम्याची सूचना करण्यात करण्यात आली आहे. मात्र पंचनाम्यासाठी एचएएलची संमती आवश्यक आहे.

ठळक मुद्देघोषणा होऊनही कार्यवाही नाही : भरपाईपासून वंचित

नाशिक : सव्वादोन महिन्यांपूर्वी तांत्रिक चाचणी घेताना कोसळलेल्या एचएएलच्या सुखोई विमानामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची घोषणा शासनाने केली असली तरी, त्याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. शासनाने एचएएलकडून भरपाई मागण्याचे ठरविले असल्याने शेतकºयांच्या नुकसानीचा आकडा ठरविण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षकांना फेरपंचनाम्याची सूचना करण्यात करण्यात आली आहे. मात्र पंचनाम्यासाठी एचएएलची संमती आवश्यक आहे.एचएएल येथून चाचणीसाठी उड्डाण केलेले सुखोई विमान २७ जून रोजी निफाड तालुक्यातील गोरठाण शिवारात कोसळले होते. या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नसली तरी, सुमारे साडेसात हेक्टर जमिनीवरील द्राक्षबागा पूर्णत: उद्ध्वस्त झाल्या व साधारणत: दीड किलोमीटर परिसरात अपघातग्रस्त विमानाचे अवशेष इस्तत: विखुरले होते. या घटनेचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात येऊन कृषी सहायक व तलाठ्यांनी आपला अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला असता, साधारणत: पंधरा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. कृषी सहायक व तलाठ्यांनी दिलेल्या या अहवालाशी खुद्द जिल्हा प्रशासनानेच असहमती दर्शवित इतक्या मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकत नसल्याचे प्रतिकूल मत नोंदवून फेरपंचनाम्याचे आदेश दिले होते. शिवाय नैसर्गिक आपत्तीत वा शासनाने घोषित केलेल्या प्रकरणातच पीक नुकसानीच्या भरपाईची तरतूद असल्यामुळे विमान दुर्घटनेतील शेतकºयांना नुकसान कशाच्या आधारे द्यावे, असा प्रश्न उपस्थित करून प्रशासनाने आपले अंग झटकले होत. तथापि, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार छगन भुजबळ यांनी सदरचा प्रश्न उपस्थित करून नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदतीची मागणी केल्याने याप्रश्नी वाचा फुटली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार व एचएएल दोन्ही मिळून शेतकºयांना मदत करतील, अशी घोषणा केली. दुर्घटनेला सव्वादोन महिने तर शासनाच्या घोेषणेलाही दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यावरही अद्याप शेतकºयांना भरपाईची रक्कम मिळालेली नाही. पॉवर ग्रीडच्या टॉवर उभारणी दरम्यान शेतकºयांना ज्याप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात आले, त्या धर्तीवर सुखोईग्रस्त शेतकºयांना भरपाई द्यायची असल्यास त्यासाठी अगोदर एचएएलची संमतीची गरज असून, अद्यापही एचएएलने तशी संमती दिलेली नाही. शेतकरी आशा बाळगूनपॉवर ग्रीडच्या धर्तीवर नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याच्यासूचना जिल्हा प्रशासनाने कृषी खात्याला दिल्या आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात यावर कार्यवाही होईल, अशी अपेक्षाशेतकरी बाळगून आहेत.