शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
2
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
3
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
4
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
5
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
6
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
7
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
8
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
9
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
10
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
11
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
12
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
13
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
14
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
15
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
16
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
17
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
18
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
19
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
20
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?

‘इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन’मुळे कोरोनाचा फैलाव टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 9:45 PM

नाशिक : प्रारंभी जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले त्यांचे अत्यंत चांगल्या पद्धतीने कॉन्टक्ट ट्रेसिंग केल्यामुळे त्यांच्या संपर्कातील नागरिकांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यांच्यामधूनच काही रु ग्णांचे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त होत आहेत.

नाशिक : प्रारंभी जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले त्यांचे अत्यंत चांगल्या पद्धतीने कॉन्टक्ट ट्रेसिंग केल्यामुळे त्यांच्या संपर्कातील नागरिकांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यांच्यामधूनच काही रु ग्णांचे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त होत आहेत. त्यामुळे इन्स्टिट्युशनल क्वारंटाइनमुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यात स्थानिक आरोग्य प्रशासनाला यश आल्याचा दावा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केला आहे.नाशिक जिल्ह्यात २८ मार्चपर्यंत एकही ‘कोरोना’बाधित रु ग्ण आढळून आला नव्हता, परंतु आजअखेर कोरोनाबाधित ७० रु ग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक ६२ रु ग्ण हे मालेगाव शहरातील असून, इतर ८ रु ग्णांपैकी ५ रु ग्ण हे नाशिक शहरातील असून, उर्वरित तीन रु ग्ण हे इतर तालुक्यातील आहेत. जवळपास १५ तालुक्यांपैकी ४ तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येतो, तर अन्य ११ तालुक्यांमध्ये एकही कोरोनाबाधित रु ग्ण आढळून आलेला नाही ही दिलासा देणारी बाब असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.आता २० एप्रिलपासून दुसºया टप्प्याला सुरुवात करायची आहे. त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील ८० टक्के भूभाग हा आजही कोरोनामुक्त आहे. त्यामुळे तेथील निर्बंध काहीअंशी शिथिल करण्यासाठी शासनामार्फत मार्गदर्शक सूचनादेखील प्राप्त झाल्या आहेत. त्याची अंमलबजावणी आपण करणार आहोत. त्यामुळे आजतागायत संपूर्ण लॉकडाउन असलेला जो भूभाग कोरोना प्रभावित नाही, त्याठिकाणी काही प्रमाणात मोकळीक देण्यात येणार आहे. त्यासाठी काही नियम, अटी व विविध परवानग्यांची आवश्यकता असणार आहे.या कालावधीतील नियम, अटी व परवानग्या कशा मिळतील याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येणार आहे. सर्व संबंधित विभागांमार्फत यासाठी हेल्पलाइन सुविधा कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना सुकर पद्धतीने परवानग्या मिळतील याचे नियोजन करण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक