शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

एक संस्था बंद; तिघांचे बंदचे प्रस्ताव

By admin | Updated: June 29, 2014 00:47 IST

एक संस्था बंद; तिघांचे बंदचे प्रस्ताव

 

सुदीप गुजराथी

नाशिकअनाथ बालकांचा सांभाळ करणाऱ्या काही संस्थांची मनमानी सुरू असताना, जिल्ह्यातील एक संस्था गैरकारभारामुळे आधीच बंद पडली आहे. आणखी एका संस्थेत महिला व बालकल्याण विभागाकडून संगोपनासाठी बालके ठेवली जात नाहीत, तर तीन संस्था बंद करण्यासाठी अर्ज दाखल झाले असल्याचे वृत्त आहे. नाशिक शहर व जिल्ह्यात अनाथ बालकांचा सांभाळ करणाऱ्या २८ संस्था आहेत. या संस्थांत सुमारे सोळाशे अनाथ बालके वास्तव्य करतात. प्रत्येक संस्थेत ५० ते १०० मुला-मुलींचा सांभाळ केला जातो; मात्र गेल्या काही दिवसांपासून यांपैकी काही संस्थांना ग्रहण लागले आहे. शहरातील पेठरोडच्या तवली फाटा येथील जय आनंद अनाथाश्रमात गेल्या वर्षी मार्चमध्ये मुलींबाबत गैरप्रकार घडल्याने ही संस्था महिला व बालकल्याण विभागानेच बंद करून तेथील मुले-मुली अन्यत्र स्थलांतरित केल्या. मनमाडच्या ‘मनोरमा सदन’ येथून झालेल्या मुलीच्या अपहरणाचे प्रकरण पंधरवड्यापूर्वी गाजले. तेथेदेखील महिला व बालकल्याण विभागाने मुले ठेवलेली नाहीत. संस्थेतील कर्मचारी प्रशिक्षित नसल्याने सध्या संस्थेत मुले ठेवू नयेत, असे या संस्थेच्या वतीनेच सांगण्यात आले आहे. या दोन्ही संस्थांमधील मुले अन्य संस्थांत हलवावी लागली आहेत. परिणामी, काही संस्थांमध्ये काही दिवस का होईना, क्षमतेपेक्षा अधिक मुले ठेवावी लागल्याचे वृत्त आहे. सध्या जिल्ह्यातील एकाही संस्थेत क्षमतेपेक्षा अधिक मुले-मुली नसल्याचा दावा महिला व बालकल्याण विभागाने केला आहे; मात्र अशा संस्था बंद होत राहिल्यास हा प्रश्न भविष्यात गंभीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बंद होणाऱ्या संस्थांची संख्या वाढल्यास सुरू असलेल्या संस्थांतील मुलांच्या संख्येचा ‘कोटा’ वाढविला जाईल, असे महिला व बालकल्याण विभागाने स्पष्ट केले आहे.