शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

पंचायत राज समितीकडून जिल्ह्यातील कामांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:19 IST

पंचायत राज समितीने गुरुवारी दिवसभर जिल्हा परिषदेत सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाचे लेखापुनरिक्षण संदर्भात उपस्थित मुद्द्यांवर अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवून ...

पंचायत राज समितीने गुरुवारी दिवसभर जिल्हा परिषदेत सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाचे लेखापुनरिक्षण संदर्भात उपस्थित मुद्द्यांवर अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवून घेतल्यानंतर शुक्रवारी (दि. २७) समिती सदस्यांची पाच पथके करण्यात आली. त्यांच्या सोबत संपर्क अधिकारीही नेमण्यात आले. त्यानुसार प्रत्येक पथकाने तीन तालुक्यांची पाहणी केली. स्वत: समिती अध्यक्ष डॉ. संजय रायमुलकर यांनी निफाड, सिन्नर या तालुक्यांना भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली तर अन्य सदस्यांनी ग्रामीण भागातील अंगणवाडी, आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, शाळा, ग्रामपंचायती, पाणीपुरवठा योजना, पशुवैद्यकीय दवाखान्यांना भेटी देऊन तेथील कामकाजाच्या पद्धती समजावून घेतल्या; तसेच कुपोषण मुक्तीसाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांची प्रत्यक्ष खात्री केली. शनिवारी (दि. २८) समितीच्या कामकाजाचा अखेरचा दिवस असून, सन २०१७-१८ या वर्षाच्या जिल्हा परिषदेच्या वार्षिक अहवालाच्या कार्यपूर्ततेचा आढावा समिती घेणार आहे.

चौकट===

विल्होळीत कामांची पाहणी

शुक्रवारी (दि. २७) पंचायत राज समितीने विल्होळी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, अंगणवाडी यांना भेट देऊन विकासकामांचा आढावा घेत शासकीय उपक्रमांची माहिती घेतली. समितीचे सदस्य आमदार सुभाष घोटे, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार माधवराव जळगावकर, आमदार किशोर दराडे, आमदार कैलास पाटील, विधिमंडळ अधिकारी शशिकांत साखरकर यांनी विल्होळी ग्रामपंचायतीतील विकासकामांचा आढावा घेतला. तसेच व्यक्तीस लाभ कसा दिला जातो, याची माहिती घेतली. तसेच जिल्हा परिषद शाळेचा संगणक कक्ष, प्रयोगशाळा, कार्यालयास भेट देऊन शाळेतील नवनवीन उपक्रमांविषयी माहिती घेतली. त्यामध्ये ओट्यावरची शाळा, घरी जाऊन घेतलेली शाळा, ऑनलाइन शिक्षण - झूम, गुगलद्वारे, विषयमित्र, गल्लीमित्र, डोनेट व डिवाइस, स्वाध्याय उपक्रम, शिष्यवृत्ती, ऑनलाइन पालक सभा, ऑनलाइन सेतू अभ्यासक्रम याबाबतची सर्व माहिती मुख्याध्यापक प्रशांत शेवाळे यांनी समितीस दिली. प्राथमिक उपकेंद्रात औषधांचा साठा, साथीच्या रोगावरील नियोजन, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया या रोगांवरील प्रतिबंधक लसींबाबत आढावा घेऊन त्याबाबत सविस्तर माहिती आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप जायभावे यांनी दिली. अंगणवाडीला भेट देऊन पोषण आहार, पोषण आहार वाटप, कुपोषित बालके, बालकांची संख्या याबाबतची माहिती घेतली. या वेळी प्रकल्प अधिकारी उज्ज्वला बावके, गट विकास अधिकारी सारिका बारी, शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर, विस्ताराधिकारी भाऊसाहेब ठाकरे, उपअभियंता एन.आर. पाटील, जगन्नाथ सोनवणे, श्रीधर सानप, नीलेश पाटोळे, गोरख शेवाळे, गौतम अग्निहोत्री, प्रकाशदास वैष्णव, सरपंच जानकाबाई चव्हाण, उपसरपंच भास्कर थोरात, बळीराम पगार, मोहन रणदिवे, डॉ. प्रदीप जायभावे, डॉ. गौरव भोई, प्रशांत शेवाळे, सोनाली पगार, दिगंबर गोसावी आदी उपस्थित होते.

(फाेटो २७ विल्होळी)