शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान यंत्रांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 01:19 IST

जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी यंत्रणा कामाला लागली असून, शुक्रवारी तालुका पातळीवर बॅलेट आणि कंट्रोल युनिटची प्राथमिक स्तर तपासणी करण्यात आली तर काही तालुक्यांमध्ये कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही पार पडले. २१३२ प्रभागांमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी सुमारे अडीच हजार बॅलेट आणि तितकेच कंट्रोल युनिट यंत्रे लागणार आहेत. ज्या ठिकाणी बॅलेट आणि कंट्रोल युनिटची पडताळणी करण्यासाठी तहसील कार्यालयांमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली होती. 

ठळक मुद्देपहिला टप्पा: अडीच हजार लागणार बॅलेट युनिट 

नाशिक : जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी यंत्रणा कामाला लागली असून, शुक्रवारी तालुका पातळीवर बॅलेट आणि कंट्रोल युनिटची प्राथमिक स्तर तपासणी करण्यात आली तर काही तालुक्यांमध्ये कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही पार पडले. २१३२ प्रभागांमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी सुमारे अडीच हजार बॅलेट आणि तितकेच कंट्रोल युनिट यंत्रे लागणार आहेत. ज्या ठिकाणी बॅलेट आणि कंट्रोल युनिटची पडताळणी करण्यासाठी तहसील कार्यालयांमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली होती. निवडणुकीसाठी लागणारे बॅलेट आणि कंट्रोल युनिट यांची प्रथम स्तर पडताळणी तहसीलदारांच्या देखरेखीखाली पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रभाग संख्येनुसार तसेच राखीव कंट्रोल आणि बॅलेटची आवश्यकता  लक्षात घेता दोन्ही मिळून  यंत्रांची तपासणी   करण्यात आली. कंट्रोल तसेच बॅलेट युनिट सुरू करण्यापासून सील करण्यापर्यंत तसेच सॉफ्टवेअर प्रणालीची चाचपणी करण्यात आली. यंत्राच्या पडताळणीतून सुस्थितीतील यंत्रणे मतदान प्रक्रियेसाठी निश्चित करण्यात आली.    जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी येत्या १५ तारखेला मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्हा स्तरावर ग्रामपंचायत निवडणूक शाखेकडून तयारीला वेग देण्यात आला आहे. गेल्या ४ तारखेला अर्ज माघारीनंतर निवडणूक रिंगणातील चित्र स्पष्ट झाले आहे. जवळपास दीड हजार उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत तर उर्वरित सुमारे अकरा हजार जागांसाठी चुरशीची निवडणूक होणार आहे. माघारीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर  निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली.नाशिक तालुक्याचे आज प्रशिक्षण निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण शनिवार, ९ रोजी सकाळी आयोजित करण्यात आले आहे. गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृह येथे सकाळपासून प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहनतळाची व्यवस्था डेांगरे वसतिगृह मैदान येथे करण्यात आलेली आहे. दुसरे प्रशिक्षण पुढील १४ तारखेला तहसील कार्यालयात पार पडणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. 

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक