शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्वच्छता मूल्यमापन समितीकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:18 IST

तालुक्यातील राजदेरवाडी येथील डोंगराळ परिसरातील कामांची पाहणी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियांनातर्गत जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीने केली. विकासकामे कौतुकास्पद असल्याचा निर्वाळा सदर समितीने भेट दिली.

चांदवड : तालुक्यातील राजदेरवाडी येथील डोंगराळ परिसरातील कामांची पाहणी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियांनातर्गत जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीने केली. विकासकामे कौतुकास्पद असल्याचा निर्वाळा सदर समितीने भेट दिली. यावेळी गावातील आयएसओ, मानांकित ग्रामपंचायत, आयएसओ जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, तसेच गावातील स्वच्छता, सांडपाणी व्यवस्था पनाबाबतच्या कामांची पाहणी समिती सदस्यांनी केली व समाधान व्यक्त केले. या समितीत मुख्य कार्यकारी अभियंता एन.एन. पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी चिंचोले, स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे समन्वयक संदीप जाधव यांचा समावेश होता. त्यांच्यासमवेत चांदवड पंचायत समितीचे सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, गटविकास अधिकारी हिरामण मानकर, सहायक गटविकास अधिकारी सुनील पाटील, विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर सपकाळे, ग्रामसेवक बी.पी. सोनवणे, सागर मोरे, विशाल सोनवणे, उपसरपंच मनोज शिंदे उपस्थित होते.या समितीने ग्रामपंचायतीचे कामकाज, नॅडेप कंपोस्ट  प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापन, शौचालय व्यवस्थापन, जिल्हा परिषद शाळा स्वच्छता व्यवस्थापन व अंगणवाडी यांना भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. घरे व गाव परिसराची स्वच्छता, स्मार्ट व्हिलेज नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. प्रास्ताविक उपसरपंच मनोज शिंदे यांनी केले. ग्रामसेवक बी. पी. सोनवणे यांनी आभार मानले. यावेळी सरपंच सखूबाई माळी, ग्रामपंचायत सदस्य दीपक जाधव, नंदराज जाधव, जगन यशवंते, सुरेश जाधव, पुंडलिक शिंदे, सुकदेव जाधव, भास्कर कापडणे, रमण जाधव, पंडित जाधव, काळू कापडणे, वसंत जाधव, जगन जाधव, नीलेश जाधव, नीलेश कापडणे, चांगदेव खुरसणे, राजाराम पवार, खंडू जाधव, राकेश कापडणे, मुख्याध्यापक नामदेव जाधव, ब्रह्मेश कदम, शीतल अहिरे, कृषी सहायक पी.पी. जाधव, कुंभार्डे व ग्रामस्थ उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांनी समितीचे स्वागत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने वेश परिधान करून केले. तालुकास्तरावर पात्र झालेल्या राजदेरवाडी, शिरसाणे, न्हनावे या तीन गावांपैकी राजदेरवाडी व शिरसाने या दोन गावांची समितीकडून पाहणी करण्यात आली. प्रत्येक तालुक्यातून दोन याप्रमाणे जिल्ह्यातील तीस गावांमधून निवड झालेल्या प्रथम तीन गावांमधून प्रथम दोन गावे विभागस्तरीय पाहणीसाठी पात्र होणार आहेत.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान