शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

‘थॅलेसिमिया मुक्त नाशिक’ अभियानात जिल्ह्यातील १० हजार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 14:23 IST

रोटरी क्लब ऑफ नाशिक संस्थेने थॅलेसिमियासारख्या गंभीर वळण घेत असलेल्या आजारातून समाजाची मुक्तता व्हावी यावर लक्ष केंद्रित केले असून या उपक्रमांतर्गत ब्ल्यू क्रॉस आणि पटूट संस्थेच्या सहकार्याने नाशिक जिल्ह्यातील विविध ४३ आश्रमशाळांतील तब्बल १० हजार विद्यार्थ्यांची मोफत थॅलेसिमिया तपासणी करण्यात आली आहे.   

ठळक मुद्देरोटरी क्लब ऑफ नाशिकचे ‘थॅलेसिमिया मुक्त नाशिक’ अभियान जिल्ह्यातील १० हजार विद्यार्थ्यांची थॅलेसिमिया तपासणी

नाशिक : गेल्या ७५ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या रोटरी क्लब ऑफ नाशिक संस्थेने केवळ शहरातच नव्हे तर जिल्ह्याच्या ग्रामीण, आदिवासी, डोंगराळ भागात जाऊन समाजाची गरज ओळखून काम करताना  आता  थॅलेसिमियासारख्या गंभीर वळण घेत असलेल्या आजारातून समाजाची मुक्तता व्हावी यावर लक्ष केंद्रित केले असून या उपक्रमांतर्गत ब्ल्यू क्रॉस आणि पटूट संस्थेच्या सहकार्याने नाशिक जिल्ह्यातील विविध ४३ आश्रमशाळांतील तब्बल १० हजार विद्यार्थ्यांची मोफत थॅलेसिमिया तपासणी करण्यात आली आहे.   थॅलेसिमिया एक रक्तजन्य अनुवांशिक रोग असून  आई वडीलांकडून या रोगाचे संक्रमण अपत्यास होते. ‘थॅलेसिमिया मेजर’ या रोगाने पीडित मुले शरीरात रक्त कमी असल्या कारणाने पिवळी पडतात. भूक, वजन आणि शारीरिक हालचाल कमी असल्याने शारीरिक विकासही कमी होतो. शरीरात रक्ताची कमतरता असल्याने अशा रुग्णांना वेळोवेळी रक्तपुरवठा करण्याची गरज भासते. या रोगाचा उपचार अत्यंत कठीण आणि खर्चिक असून तो सर्वसामान्यांना न परवडणारा आहे. जिल्ह्यात या आजाराचे उपचार मोफत व्हावेत यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकने  पुढाकार घेतला. यासाठी प्रति विद्यार्थी १०० रुपये एवढा खर्च आला. आतापर्यंत यापैकी १० हजार २०१ विद्यार्थ्यांची तपासणी पूर्ण झालेली असून, यापैकी १४९ विद्यार्थ्यांना थॅलेसिमिया माईनोर असल्याचे निदर्शनास आले असून ‘थॅलेसिमिया मुक्त नाशिक’ ही मोहीम यशस्वी करणयाच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे. 5ब6 थॅलेसिमिया माईनोर मुलगा आणि थॅलेसिमिया माईनोर मुलगी यांचा विवाह झाल्यास जन्माला येणारे मुल थॅलेसिमिया मेजर येण्याची जास्त शक्यता असते. परिणामी अशा व्यक्तींना दरमहा शरीरातील रक्त बदलावे लागते. शिवाय माईनोर मुलांचा इलाज बोनमॅरो ट्रान्सप्लांटसाठी सुमारे २५ लाखांपर्यंत खर्च येतो. प्रत्येक कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसते. हा खर्च सर्वसामान्य व्यक्तीला न परवडणारा असतो. या व्यतिरिक्त मानसिक त्रासही मोठा असतो. दरम्यान अशी वेळ दुर्दैवाने कोणावर येवू नये यासाठी ‘थॅलेसिमिया मुक्त नाशिक’ हि संकल्पना राबविण्यात आली. या उपक्रमासाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून जिल्ह्यातील १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची थॅलेसिमिया तपासणी करून पुढच्या पिढीत अडचणी येवू नयेत आणि आरोग्य चांगले राहावे यासाठी प्रयत्न करता आल्याचे रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष राधेय येवले यांनी सांगितले. 

टॅग्स :Healthआरोग्यNashikनाशिकRotary Clubरोटरी क्लब