शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाखांपेक्षा अधिक प्रवाशांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 00:34 IST

नाशिक : जिल्ह्यातील हद्दीतून गावाकडे निघालेल्या परप्रांतीय प्रवाशांची ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या चेक नाक्यावर आरोग्य तपासणी केली जात असून, तीन लाखांपेक्षा अधिक प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने केली आहे. जिल्ह्यातील २७ ठिकाणी उभारण्यात आलेल्या चेक नाक्यांवर वाहने आणि प्रवाशांची तपासणी केली जात आहे.

नाशिक : जिल्ह्यातील हद्दीतून गावाकडे निघालेल्या परप्रांतीय प्रवाशांची ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या चेक नाक्यावर आरोग्य तपासणी केली जात असून, तीन लाखांपेक्षा अधिक प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने केली आहे. जिल्ह्यातील २७ ठिकाणी उभारण्यात आलेल्या चेक नाक्यांवर वाहने आणि प्रवाशांची तपासणी केली जात आहे.राज्यात सुरू असलेल्या लॉकडाउनच्या काळात परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यात परतत असून, जिल्ह्यातील अनेक भागातून मजुरांचे लोंढे रस्त्यावर दिसू लागले आहेत. सुरुवातीला परप्रांतीयांनी पायीच गावाकडची वाट धरली होती. डोक्यावर संसार घेऊन आपल्या बालगोपाळांसह निघालेल्या प्रवाशांनी शेकडो किलोमीटरचा प्रवास केला आहे. तर काहींनी मिळेल त्या वाहनाचा आधार घेत गाव गाठण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यात ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या चेकपोस्टवर अशाप्रकारच्या वाहनांची तपासणी करण्यात येऊन मजुरांचीदेखील आरोग्य तपासणी करण्यात आली.सुमारे सव्वलाख वाहने आणि तीन लाखांपेक्षा अधिक प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. मजुरांचे लोंढे वाढतच असल्याने शासनाने या परप्रांतीय मजुरांसाठी मध्य प्रदेशात सोडण्यासाठी थेट बससेवा सुरू करण्यात आली आहे. या प्रवाशांची जागेवरच थर्मल टेस्टिंग केली जात असून, बसेस सॅनिटाईझ केल्या जात आहेत. बसमध्येदेखील केवळ २२ प्रवासी घेतले जात आहेत. दररोज बसेसद्वारे हजारो प्रवाशांना मध्य प्रदेशातील सीमारेषेवर सोडले जात आहे.-------------------------------------चेकनाक्यांवरून जाणाऱ्या वाहनांवर नजरथर्मल टेस्ट तसेच अन्य काही लक्षणे आहेत का याबाबतची तपासणी या ठिकाणी करण्यात आली. पायी जाणाºया प्रवाशांनी चेकनाके टाळून प्रवास केला. जिल्ह्यातील नांदगाव, मालेगाव, बागलाण, कळवण, सुरगाणा, येवला, सिन्नर, निफाड, पेठ, इगतपुरी, चांदवड, देवळा, दिंडोरी, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी चेकनाके उभारण्यात आले असून, या चेकनाक्यांवरून जाणाºया वाहनांची आणि प्रवाशांची तपासणी करण्यात आली.

टॅग्स :Nashikनाशिक