शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

निरीक्षण केंद्र हवामान खात्याचा आधार

By admin | Updated: April 21, 2017 01:33 IST

नाशिक : नागरिक पाऊस, ऊन, थंडीच्या तीव्रतेचा अंदाज बांधतात; मात्र हे सर्व कामकाज जबाबदारीने तापमापक यंत्रांचा अभ्यास करत त्याआधारे केले जाते.

नाशिक : अमुक मिलिमीटर पाऊस पडला, कमाल तपमानाचा पारा वर सरकला, किमान तपमानाचा पारा घसरला... यावरून सर्वसामान्य नागरिक पाऊस, ऊन, थंडीच्या तीव्रतेचा अंदाज बांधतात; मात्र हे सर्व कामकाज अत्यंत जबाबदारीने तापमापक यंत्रांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करत त्याआधारे केले जाते. पेठरोडवरील निरीक्षण केंद्रातही शहराचे ऊन, वारा, पाऊस, थंडी, आर्द्रता, दाब अशा सर्वच बाबींवर सूक्ष्म नजर ठेवली जाते. हवामान खात्याचे पान निरीक्षण केंद्रातील नोंदीशिवाय हालू शकत नाही.उन्हाची तीव्रता व थंडीचा अन् पावसाचा जोर वाढला की, सर्वसामान्य नागरिकांना आठवण होते ती कमाल तपमान किती मोजले गेले? पाऊस किती झाला? थंडीचा पारा किती घसरला? या सर्व प्रश्नांची उकल करून घेण्याची. हवामान निरीक्षण केंद्राद्वारे सर्वसामान्यांच्या या प्रश्नांची उकल करून दिली जाते; मात्र यापुढेही जाऊन हवामानात घडणारे बदल व त्यांचे निरीक्षण आणि स्थिती हवाई वाहतूक नियंत्रकांना कळविली जाते. या माहितीच्या आधारेच हवाई वाहतूक सुरक्षितरीत्या प्रवाशांना सेवा देत असते.ऊन, वारा, पाऊस, थंडीची तीव्रता, पातळी किंवा प्रमाण क से मोजले जात असेल अन् त्यावरून आकडे कसे सांगितले जात असतील याविषयीची जिज्ञासा बहुतांश लोकांच्या मनात असते. एकूणच ही सर्व मोजदाद करण्यासाठी एक स्वतंत्र शास्त्र उपलब्ध आहे. यासाठी पेठरोडवरील हवामान केंद्राला भेट देणे आवश्यक आहे. येथील कार्यालयालगत मोकळ्या जागेत सर्व तापमापक यंत्रे बसविण्यात आली आहे.डोळ्यांना नुसतीच यंत्रे जरी लावलेली दिसत असली तरी त्यामागे त्यांची उंची, यंत्र बसविण्याच्या पद्धती, दिशा, परस्परांमधील अंतर अशा सर्वच बाबींची दक्षता हवामानशास्त्राच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार निरीक्षकांकडून घेतली गेली आहे. वेळोवेळी जाऊन किमान, तपमान, कमाल तपमानाचा पारा, आर्द्रता याच्या नोंदी निरीक्षकांकडून घेतल्या जातात.