शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पिकांवर किड्यांचं आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 01:07 IST

निफाड तालुक्यातील टमाटे, कोबी, फ्लॉवर, वांगे, सोयाबीन, मका पिकांवर किडींनी मोठ्या प्रमाणात आक्रमण केले आहे.

ठळक मुद्दे बळीराजा हवालदिल : चार चार फवारण्या करूनही होईना फायदा

सायखेडा : निफाड तालुक्यातील टमाटे, कोबी, फ्लॉवर, वांगे, सोयाबीन, मका पिकांवर किडींनी मोठ्या प्रमाणात आक्रमण केले आहे.उपाय म्हणून शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करतात. मात्र या कीटकनाशकांनी किडीच्या अळी, मावा, तुडतुडे मोठ्या प्रमाणावर आले आहे. चार चार फवारण्या करूनही कीड नियंत्रणात येत नसल्याने शेतकऱ्यांनी औषधांचे प्रमाण वाढवून फवारणी सुरू केली आहे. त्यातच एकाच वेळी दोन ते तीन औषधांचा वापर केल्यानेही कीटकनाशक अत्यंत उग्र स्वरूपाचे तयार होते. त्यामुळे विषारी औषधातील घटक श्वसनावाटे फवारणी करणाºयाच्या फुप्फुसात जाऊन शेतकरी आजाराने बेजार होतात, तर काहींचे दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.शेतकरी आतापर्यंत देशी पंपाच्या साहाय्याने कीटकनाशक फवारणी करायचे. पण आता त्यांना भुरळ पडली चायना बनावटीच्या फवारणी यंत्राची. या यंत्रामुळे फवारणी दहापटीने जलद होते. पण आधीच विषारी औषधाचं प्रमाण जास्त झालेलं असताना चायना फवारणी यंत्राने हे विषारी घटक दहापट जास्त जलद गतीने हवेत मिसळण्यास मदत केली जाते. याशिवाय पिकावर कीड पडत नाही असा दावा केला जात असताना कीड पडून कीटकनाशक फवारणी करण्याची वेळ आलीच कशी, असाही एक प्रश्न पडत आहे. शेतकऱ्यांना औषधी फवारण्याचे प्रशिक्षण घेणे गरजेचे असल्याचे मत शेतकºयांकडून व्यक्त केले जात आहे.मिश्रण तयार करताना हातमोजे घालणे आणि तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे. सोबतच फवारणी करताना अंग झाकलेलं असणं गरजेचं असतं. यामध्ये हात आणि पायात मोजे, तोंडाला मास्क, डोक्यावर कापड आणि अंगभर कपडे घालणं गरजेचं आहे. वाºयाच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नये, फवारणी झाल्यानंतर काही काळ शेतात जाणं टाळावं, फवारणी करताना वापरलेले कपडे किंवा वस्तू इतर कामांसाठी वापरू नये. विषबाधेचे लक्षणं दिसून आल्यास त्वरित काही प्राथमिक उपाय करावे, असे आवाहन कृषी अभ्यासक शांताराम कमानकर यांनी केली आहे.

कीटकनाशके फवारणी करताना वारा शांत असताना करावी. लेबलवरील माहिती काळजीपूर्वक वाचून अनुकरण करावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने हातमोजे, फुलपॅन्ट व शर्ट तसेच पायात गम बूट, नाक व तोंडावर मास्क, डोक्यावर टोपी, डोळ्यावर चष्मा इत्यादीचा वापर करावा. - बी. टी. पाटील, कृषी अधिकारी, निफाड

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी