शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 01:13 IST

दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावात पाणीपुरवठा योजनेसाठी ३५ किलोमीटर पाइपलाइन टाकून पाणीपुरवठा केल्याचा अजब प्रकार जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने केल्यामुळे या विभागाने गेल्या वर्षभरात कोट्यवधी रुपये खर्चाच्या अनेक योजनांविषयी शंका उपस्थित करण्यात आली असून, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने केलेल्या ५० लाखांपुढील खर्चाच्या कामांच्या योजनांची तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेने त्रिदस्यीय समिती गठीत केली आहे.

ठळक मुद्देअजब प्रकार : पाण्यासाठी ३५ किलोमीटर टाकली पाइपलाइन

नाशिक : दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावात पाणीपुरवठा योजनेसाठी ३५ किलोमीटर पाइपलाइन टाकून पाणीपुरवठा केल्याचा अजब प्रकार जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने केल्यामुळे या विभागाने गेल्या वर्षभरात कोट्यवधी रुपये खर्चाच्या अनेक योजनांविषयी शंका उपस्थित करण्यात आली असून, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने केलेल्या ५० लाखांपुढील खर्चाच्या कामांच्या योजनांची तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेने त्रिदस्यीय समिती गठीत केली आहे. या समितीने पाहणी करून आपला अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केल्यानंतरच योजनेला मंजुरी देण्याचे ठरविण्यात आले आहे.जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या योजनांमध्ये ‘पाणी मुरत’ असल्याच्या तक्रारी सदस्यांनी केल्या आहेत.पाण्याचा स्रोत असलेल्या भागापासून गावांपर्यंत पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून खर्च केला जातो. या कामांना मान्यता देण्यापूर्वी किंवा काम पूर्ण झाल्यावर अभियंता त्या कामांची पाहणी करत नसून, निव्वळ कागदोपत्री घोडे नाचवून काम पूर्ण झाल्याचे दाखवून पैसे काढले जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या.एका पाणीपुरवठा योजनेसाठी सिन्नर ते नाशिक इतक्या अंतराची पाइपलाइन टाकली गेल्याचे कागदोपत्री उदाहरण सभागृहात देण्यात आले. या विभागाने टंचाईच्या नावाखाली गेल्या दोन वर्षात कोट्यवधी रुपयांच्या योजनांना मंजुरी दिली व योजना पूर्णत्वास आल्याचे दाखवून पैसे काढले. प्रत्यक्षात गावांना पाणीपुरवठा होऊच शकला नसल्याचा आरोप करण्यात आला. या सर्व प्रकरणात केवळ एक अधिकारी दोषी नसून त्यांच्या हाताखाली काम करणारे अन्य अधिकारी व ठेकेदाराच्या संगनमताने कामांमध्ये ह्यपाणीह्ण मुरत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे गेल्या पाच वर्षात पाणीपुरवठा विभागाने केलेल्या कामांची तपासणी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्याचा ठराव डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी मांडला. त्यास बाळासाहेब क्षीरसागर यांनी अनुमोदन दिले.एक कोटी रुपयांवरील कामे मंजूर करण्यापूर्वी ही समिती प्रत्यक्ष कामाची पाहणी करून त्याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी ठेवतील. त्यांनी मंजुरी दिल्यानंतरच या कामांना सुरुवात होणार असून, एककोटींच्या पुढील योजनांच्या मंजुरीसाठी प्रत्यक्ष पाहणी केल्याशिवाय मंजुरी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदWaterपाणी