शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेत एलईडी पथदीप बसविण्याच्या कामात झालेल्या घोटाळ्याची चौकशी येवला पालिकेत चौकशी समिती दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 00:26 IST

पालिकेत एलईडी पथदीप बसविण्याच्या कामात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाºयांच्या आदेशान्वये त्रिसदस्यीय चौकशी समितीने शनिवारी (दि. १६) येवला नगरपालिकेत बैठक घेऊन कागदपत्रांची तपासणी केली.

ठळक मुद्दे लाईट बसविण्याच्या कामात घोटाळात्रिसदस्सीय चौकशी समिती स्थापनकागदपत्रांची तपासणी

येवला : पालिकेत एलईडी पथदीप बसविण्याच्या कामात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाºयांच्या आदेशान्वये त्रिसदस्यीय चौकशी समितीने शनिवारी (दि. १६) येवला नगरपालिकेत बैठक घेऊन कागदपत्रांची तपासणी केली.येवला पालिकेत एलईडी स्ट्रीट लाईट बसविण्याच्या कामात घोटाळा झाल्याची लेखी तक्र ार राष्ट्रवादी, सेना आणि अपक्ष अशा १९ नगरसेवकांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांचेकडे १४ नोव्हेंबरला केली होती. जिल्हाधिकाºयांनी तत्काळ त्रिसदस्सीय चौकशी समिती स्थापन करून १५ दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्यासह चौकशी पूर्ण होईपर्यंत या प्रकरणी कोणत्याही प्रकारचे बिल संबंधितांना अदा करू नये, असे आदेश दिले होते. तब्बल महिनाभरानंतर येवल्यात शनिवारी (दि. १६) चौकशीसाठी आलेल्या त्रिसदस्सीय समितीने कामकाज सुरू करीत बैठक घेतली. येवल्याचे प्रांताधिकारी भीमराज दराडे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता राजन कोळपकर, जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखाधिकारीराजेंद्र कासार यांचा समावेश होता. कागदपत्रांची तपासणी करीत तक्रारदार राष्ट्रवादी,सेना व अपक्ष नगरसेवकांचे तीनही गटनेते यांचे म्हणणे ऐकले. चौकशी समितीने सुमारे दोन तास पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांच्यासह विद्युत अभियंता ब्रिजेश सिंग, संगणक अभियंता अभितोष सांगळे यांना बोलावित कागदपत्रांची पहाणी केली. तक्र ारकर्ते नगरसेवक डॉ.संकेत शिंदे, दयानंद जावळे, रु पेश लोणारी, सचिन मोरे यांचे म्हणणे ऐकून घेतले.यावेळी डॉ. संकेत शिंदे यांनी मुद्देसुद मांडणी करून एलईडी घोटाळा नेमका झाला कसा? त्याच कंपनीचा तोच एलईडी वेबसाईटवर किती किंमतीत व खाजगीत याच एलईडीचे कोटेशन किती हे पुराव्यासह मांडले. ठेका घेतलेल्या कंपनीने भारतीय मानके यांचेही पालन केले नसल्याचे मत मांडले. तसेच शहरातील पिंजारगल्ली , नगर-मनमाड राज्य महामार्गावर एलईडी लाईट न बसवता बिल काढल्याचा आरोपातील तथ्याचीही पहाणी समिती सदस्यांनी केली. यावेळी जीएसटी २ टक्के कापून शासनाची फसवणुक केल्याचा आरोपही डॉ.संकेत शिंदे यांनी केला. दरम्यान त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष प्रांताधिकारी भीमराज दराडे यांनी चौकशी समितीचा अहवाल गोपनीय राहणार असून पाहणीमध्ये आढळले असेल ते अहवालामध्ये नमुद करीत आठ दिवसांत जिल्हाधिकाºयांना अहवाल सादर करणार असल्याचे सांगीतले.