शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजनप्रकरणी ठेकेदाराला चौकशी समितीची प्रश्नावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:15 IST

नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवारी (दि.२१) दुपारी ऑक्सिजन गळती झाली, यात तत्काळ २२ तर नंतर दोन ...

नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवारी (दि.२१) दुपारी ऑक्सिजन गळती झाली, यात तत्काळ २२ तर नंतर दोन अशा २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महापालिकेने ऑक्सिजन टाक्या बसवूननंतर दहा वर्षे देखभाल दुरुस्तीचे एका कंपनीला दिले आहे. तायो निपॉन या मूळ जपानी कंपनीला हे काम देण्यात आले असून, त्यांचे कार्यालय पुणे येथे आहे. टाकी ३१ मार्च रोजी बसवल्यानंतर अवघ्या २१व्या दिवशी ही दुर्घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे त्याठिकाणी संबंधित कंपनीचे तंत्रज्ञ होते किंवा नाही आणि कंपनीने कोणाची नियुक्ती केली हे स्पष्ट झाले नाही. महापालिकेला दोन स्थानिक पुरवठादारांचे तंत्रज्ञ पाठवून गळती थांबवावी लागली होती.

या घटनेनंतर तब्बल ४८ तासांनी कंपनीचे दोन अधिकारी शुक्रवारी (दि. २३) नाशिकमध्ये दाखल झाले. राज्य शासनाच्या वतीने या संदर्भात उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली असल्याने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी त्यांची भेट घेतली. मात्र, त्यांची उत्तरे देण्याची पुरेशी तयारी नसल्याने विभागीय आयुक्तांनी त्यांना प्रश्नावली दिली असून, त्या आधारे उत्तर देण्यास सांगितले आहे. दरम्यान, पोलीस दलाने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, ४८ तासांनी आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची त्याचे जाबजबाब घेण्याऐवजी महापालिकेच्या डाॅक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. मूळ जबाबदारी ठेकेदार कंपनीची असताना महापालिकेच्या डॉक्टरांना जाब जबाबासाठी बोलवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

इन्फो...

तंत्रज्ञ तातडीने नियुक्त करा

संबंधित ऑक्सिजन पुरवणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी तातडीने एक तंत्रज्ञ नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. बिटको आणि झाकीर हुसेन रुग्णालय येथे दोन ऑक्सिजन टाक्या असून, त्यांची दिवसभरात तीन ते चार वेळा तपासणी करण्याचे आदेश जाधव यांनी दिले आहेत.

इन्फो...

पोलीस पथक आता पुण्याला जाणार?

ऑक्सिजन गळतीप्रकरणी नाशिकमध्ये आलेल्या ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना पोलीस यंत्रणा गाठू शकली नाही. संबंधित अधिकारी निघून गेल्यानंतर पोलीस पथक महापालिकेत पोहोचल्याचे समजते. आता अधिकाऱ्यांना जबाबासाठी नोटीस बजावायला खास पोलीस पथक पुणे येथे जाणार आहे.