शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

मुलांच्या पायांचे ठसे घेऊन शाळेत अभिनव स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:56 IST

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये सोमवारी शाळा प्रवेशोत्सव सोहळा अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला.

नाशिक : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये सोमवारी शाळा प्रवेशोत्सव सोहळा अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला.अंगणवाडींमध्येदेखील नव्यानेच दाखल झालेल्या मुलांच्या पायांचे ठसे घेण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. सलग दुसऱ्या वर्षी नाशिक जिल्ह्यात अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात शाळा व अंगणवाडी प्रवेशोस्तव साजरा करण्यात आला असून, ग्रामीण भागातील शाळांकडे पालकांचा कल वाढावा व शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित व्हावे यासाठी व्यापक प्रमाणात हा सोहळा साजरा करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.शाळा व अंगणवाडी प्रवेशोत्सवानिमित्त विविध वेशभूषा केलेली मुले, लेजीम पथक, बैलगाडीसारख्या वाहनातून मिरवणूक यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण होते. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अपर्णा खोसकर यांनी नाशिक तालुक्यातील सावरगाव, गंगाव्हरे, मुंगसरे येथील शाळा व अंगणवाडींना भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. जिल्हा परिषदेच्या वतीने शाळा प्रवेशोत्सव सोहळ्यानिमित्त जिल्ह्यात ११ ते ३० जून या कालावधीत ६ ते १४ वयोगटातील सर्व मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी पटनोंदणी पंधरवडा राबविण्यात येत असून, विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. ग्रामस्तरावर शाळा व्यवस्थापन समितीची बैठक, पालक-शिक्षक समिती बैठक, मोफत पाठ्यपुस्तके वितरण नियोजन, शाळाबाह्य मुलांच्या भेटी, गाव दवंडी, मशाल फेरी आदी उपक्रमांचे आयोजन करून जिल्ह्यातील ग्रामीण भागात वातावरण निर्मिती करण्यात आली.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्र