शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

गणिताच्या आवडीसाठी ‘गणितमित्र’चा अभिनव उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 01:03 IST

शालेय शिक्षणात गणिताला महत्त्वाचे स्थान आहे. शालेयस्तरावर दहावीपर्यंत गणित हा अनिवार्य विषय आहे. या शालेय जीवनात गणिताची गोडी विकसित झाली तर गणित हा आयुष्यभर आवडीचा विषय बनतो. याकरिता विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी गणित विषयाची गोडी वाढविण्यासाठी नाशिकच्या दोन गणिततज्ज्ञ शिक्षकांनी व्हॉट््सअ‍ॅप ग्रुप सुरू केला असून, राज्यभरातील शिक्षक आणि विद्यार्थी या माध्यमातून गणितामध्ये रूची घेऊ लागले आहेत.

नाशिक : शालेय शिक्षणात गणिताला महत्त्वाचे स्थान आहे. शालेयस्तरावर दहावीपर्यंत गणित हा अनिवार्य विषय आहे. या शालेय जीवनात गणिताची गोडी विकसित झाली तर गणित हा आयुष्यभर आवडीचा विषय बनतो. याकरिता विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी गणित विषयाची गोडी वाढविण्यासाठी नाशिकच्या दोन गणिततज्ज्ञ शिक्षकांनी व्हॉट््सअ‍ॅप ग्रुप सुरू केला असून, राज्यभरातील शिक्षक आणि विद्यार्थी या माध्यमातून गणितामध्ये रूची घेऊ लागले आहेत.फेब्रुवारी २०१९ पासून ‘गणितमित्र नाशिक’ या संकल्पनेची सुरुवात गणिततज्ज्ञ शिक्षक वाल्मीक चव्हाण आणि वैभव शिंदे या गणितमित्रांनी सुरुवात केली आहे. या ‘गणितमित्र नाशिक’ मंचाचे एका छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होत आहे. नाशिक येथे गणित विषय सहायक म्हणून कार्यरत या शिक्षकांनी संपूर्ण महाराष्ट्रात गणिताची सर्वांमध्ये ओढ निर्माण करण्यासाठी ही चळवळ सुरू केली आहे.तंत्रज्ञानाच्या युगात सामाजिक माध्यमांचा परिणामकारक वापर करताना गणिताविषयी आपल्या शंका, समाधान, अडचणी सोडविण्यासाठी ‘व्हॉट््सअ‍ॅपवर’ गणितमित्र संपर्क साधू शकतात. गणित म्हणजे काय? आपल्या पाल्याला, विद्यार्थ्याला, स्वत: आपल्याला गणिताची अभिरु ची कशी वाढवावी? याकरिता गणितमित्र मंचावरून प्रत्येक गणितमित्राला नियमतिपणे व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करून आतापर्यंत जवळपास ४५०० शिक्षक, १३०० पालक-विद्यार्थी या सेवेचा लाभ घेत आहेत. यात योगेश महाजन, सुनील पेलमहाले, वर्षा चौधरी आदी गणितमित्र शिक्षकांनी राबविलेले उपक्र म, लेख, कृती हे सुद्धा वाचकांपर्यंत पाठविण्यात येत आहेत. गणितमित्रांचे वाढत्या लोकप्रियतेमुळे नवीन जोडणाऱ्या गणितमित्रांना सुद्धा मागील सर्व माहिती उपलब्ध व्हावी.याकरिता एप्रिल-२०१९ पासून ‘६६६.ँल्ल्र३े्र३१ं.ूङ्म.्रल्ल ही वेबसाइट सुरु करण्यात आली. अत्यंत अल्पावधीत या वेबसाइटला आतापर्यंत १३ लाखांपेक्षा अधिक वेळा गणितमित्रांनी भेट दिली आहे. भारताबाहेर सुद्धा गणितमित्र जोडले गेले आहे.आॅस्ट्रेलिया येथील काही पालक या मंचावर सक्रि य आहेत. याचा नियमित वापर करणाºया शिक्षक-पालक यांचा सकारात्मक प्रतिसाद नियमतिपणे मिळत आहे. आणखी असाच प्रतिसाद वाढू शकतो.असे आहे कार्य, असे आहे उद्दिष्टस्पर्धा परीक्षेतील विचार करणारे प्रश्न, सहज सोपे सुलभ गणित, अमूर्त समजले जाणारे गणित मूर्तस्वरूपात बघण्याचा दृष्टिकोन विकसित करणारे गणित, गणित साहित्याचे उपयोजन, आपल्या गणितीय शंका व समस्या यांचे निराकरण, गणित विषयक विविध लेख व उपक्र म, एक प्रश्न आपल्यासाठी, दर आठवड्याला पाच प्रश्नांची प्रश्नमंजूषा तसेच प्रत्येक मूल व व्यक्ती गणित शिकू शकते हादृष्टिकोन विकसित करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.गणिताची भीती दूर करण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नैसर्गिक व शास्त्रशुद्ध पद्धतीने गणित अध्ययन अध्यापन केल्यास गणिताची भीती दूर होऊन शकते. गणिताची भीती नव्हे तर गोडी निर्माण करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. यासाठी मुळात गणिताची आवड निर्माण होणे अपेक्षित आहे. अशी आवड निर्माण होणे व ज्यांना आवड आहे त्यांच्यात ती अधिक वृद्धिगंत होण्यासाठी हा उप्रकम महत्त्वपूर्ण आहे.वाल्मीक चव्हाण, गणितमित्र शिक्षकगणित विषयाची अभिरूची निर्माण करण्यासाठी आवश्यक ते ज्ञान, कौशल्य संपादित करण्यासाठी तसेच गणितातील समस्या, शंका सोडविण्यासाठी गणितमित्र मंचची स्थापना केलेली आहे. गणिताची आवड असलेले आणि नसलेले या प्रवाहात सहभागी होत असून, गणिताची चळवळ उभी राहत आहे.- वैभव शिंदे, गणितमित्र शिक्षक

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी