शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

धर्मक्रियेत अपूर्व आनंदाची अनुभूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 00:32 IST

पर्वतिथीच्या दिवशी भगवंताच्या दर्शनास आल्याचे कर्तव्य स्वर्गातील देवसुद्धा करतात तर आपल्याला करायलाच हवे. आपल्या हृदयात जेव्हा धर्माप्रती आदर-बहुमान निर्माण होईल तेव्हा अशा धर्मक्रियेत अपूर्व आनंदाची अनुभूती होईल, असे प्रतिपादन जैनाचार्य प्रवचनप्रदीप पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले.

ठळक मुद्देपुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांचे प्रवचन

नाशिकरोड : पर्वतिथीच्या दिवशी भगवंताच्या दर्शनास आल्याचे कर्तव्य स्वर्गातील देवसुद्धा करतात तर आपल्याला करायलाच हवे. आपल्या हृदयात जेव्हा धर्माप्रती आदर-बहुमान निर्माण होईल तेव्हा अशा धर्मक्रियेत अपूर्व आनंदाची अनुभूती होईल, असे प्रतिपादन जैनाचार्य प्रवचनप्रदीप पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले.लॅमरोड बालगृहरोड येथील कालापूर्णम् धाममध्ये उपधानतपाच्या प्रवचनात बोलताना जैनाचार्य सुरीश्वरजी महाराज यांनी आजच्या युगात हिल स्टेशनवर फिरायला जायला लागलीच तयार होतो. मात्र मंदिरात देवाकडे जायला कंटाळा करतो. त्याचाच अर्थ असा की जितका संसार मनात ठसला आहे तितका धर्माचे प्रेम हृदयात जागृत झालेले नाही. शिलभद्रच्या कथेचा पुढील भाग सांगताना जैनाचार्य सुरीश्वरजी महाराज म्हणाले की, संगमच्या कथेत त्याच्या मनात साधू महाराजांसाठी कसा आदर होता हे आपण बघितले. आज माझ्या घरी खीरसारखे परमान्न हजर आहे. त्यात साधू-संत आले आहेत ही माझ्यासाठी सुवर्णसंधी आहे. म्हणून स्वत:चा विचार न करता संगमने सर्व खीर साधू-संतांच्या पात्रामध्ये समर्पित केली. साधू महाराज बस झालं-बस झाल असे सांगत राहिले तरीदेखील संगमच्या मनाचे उत्कृष्ट भाव पाहून त्यांनीही संगमला नाकारता आले नाही. संगमच्या चेहऱ्यावरची आनंदरेखा अविस्मरणीय होती, असे जैनाचार्य सुरीश्वरजी महाराज यांनी सांगितले.आज पर्वतिथीचा दिवस असल्याने उपधान तपाच्या आराधकांना दैनंदिन कार्यापेक्षा चैत्य परिपारीचा महिमा सांगण्यात आली. चैत्य परिवारी म्हणजे आजूबाजूच्या मंदिरात देवदर्शनासाठी जाणे होय. देवळाली परिसरात असलेल्या मंदिरांमध्ये बुधवारी सकाळीआचार्यश्री तसेच साधू-साध्वी, आराधक दर्शनासाठी गेले होते.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम