शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक; संभाजी ब्रिगेडचे २ कार्यकर्ते ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 16:17 IST

साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी नाशिकमध्ये आले असताना गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

नाशिक: ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक करण्यात आली आहे. कुबेर हे साहित्य संमेलनातील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले असताना दोन जणांनी त्यांच्यावर शाई फेकली. दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. शाई फेकणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आपण संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते असल्याचं दोघांनी सांगितलं. गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या 'रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र' या पुस्तकातून संभाजी महाराजांची बदनामी झाल्याचा संभाजी ब्रिगेडचा आरोप आहे. त्याचा निषेध म्हणून कुबेरांवर शाई फेकल्याचं ब्रिगेडकडून सांगण्यात आलं. या संपूर्ण कृत्याची जबाबदारी संभाजी ब्रिगेडचे नितीन रोटे पाटील यांनी स्वीकारली. आम्ही केलेल्या कृत्याचा आम्हाला कोणताही पश्चाताप वाटत नाही. कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यास आम्ही तयार आहोत, असं रोटे पाटील यांनी म्हटलं.पुस्तकाबद्दल आक्षेप काय?'रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र' या पुस्तकात संभाजी महाराजांबद्दल अतिशय आक्षेपार्ह लिखाण असल्याचा दावा संभाजी ब्रिगेडचे नितीन रोटे पाटील यांनी केला. 'संभाजी महाराजांनी त्यांच्या आईची हत्या केली, असा उल्लेख पुस्तकात आहे. त्याबद्दल संभाजी ब्रिगेडनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आज आमच्या संघटनेच्या दोन कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाईफेक केली. आम्हाला याचा जराही पश्चाताप वाटत नाही,' असं रोटे पाटील म्हणाले.सकाळपासूनच कुणकुण होती- भुजबळसंभाजी ब्रिगेडकडून गिरीश कुबेर यांचा निषेध केला जाईल. निवेदन देऊन ते निषेध व्यक्त करतील असं मला वाटलं होतं, असं नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. पुण्यातून २ जण मोटरसायकलवरून आले होते. त्यांनी काळी पावडर कुबेर यांच्या अंगावर फेकली. व्यासपीठाजवळील प्रवेशद्वाराजवळ मोटारसायकलचा वेग कमी करत दोघांनी काळी पावडर फेकली. त्यावेळी पंकज भुजबळ यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेड