येवला : शहरातील गोविंदनगर भागात पारेगाव रस्त्यावर झाडावर चढलेल्या जखमी धामण जातीच्या सर्पास नागरिकांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले. पक्ष्यांच्या हल्ल्यात धामण सर्प झाडावर अडकला व जखमी झालेला होता.शहरातील पारेगाव रोडच्या कडेला आबासाहेब शिंदे यांच्या शेताजवळ एक धामण सर्प झाडावर चढला होता. त्याला पक्षी टोचा मारत असल्याचे समोरच असलेल्या व्यवसायीक वैभव काळे यांच्या लक्षात आले. यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती, मात्र सर्पाची जाडी व लांबी पाहून अनेकांची भंबेरी उडाली. काळे यांनी तात्काळ सर्पमित्र संजय लावरे यांना बोलावले. लावरे यांनी, या साडे सहा फूट लांबीच्या धामण सर्पाला अलगद रित्या झाडावरून खाली आणले. जखमी झालेल्या धामण सर्पाला पाणी पाजून औषधोपचार केले. त्यानंतर वन हद्दीत सोडून दिले.
येवल्यात जखमी सर्पाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 18:12 IST