शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कळवण बाजार समितीने कांदा लिलाव तात्काळ सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 16:52 IST

कळवण : केंद्र सरकारने कांदा साठवणुकीवर दोन टनापर्यंत मर्यादा घातल्याने या निर्णयाविरोधात नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांदा व्यापारी बांधवानी बेमुदत संप सुरु केला आहे. त्यामुळे कळवणसह जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बेमुदत बंद आहे. कळवण कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीने कांदा लिलाव तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी राज्य कांदा उत्पादक संघटनेने केली आहे याबाबत कळवण बाजार समितीला निवेदन दिले.

ठळक मुद्देराज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी

कळवण : केंद्र सरकारने कांदा साठवणुकीवर दोन टनापर्यंत मर्यादा घातल्याने या निर्णयाविरोधात नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांदा व्यापारी बांधवानी बेमुदत संप सुरु केला आहे. त्यामुळे कळवणसह जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बेमुदत बंद आहे. कळवण कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीने कांदा लिलाव तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी राज्य कांदा उत्पादक संघटनेने केली आहे याबाबत कळवण बाजार समितीला निवेदन दिले.केंद्र सरकारने कांद्याच्या होलसेल साठी 25 टनाची व किरकोळ साठी 2 टनाची साठ्याची मर्यादा घालून दिल्याने बाजार समित्यांनी व्यापारी अर्जानुसार लिलावाचे कामकाज बंद ठेवले आहे.परंतु सध्या दिवाळीचा सण तोंडावर आल्याने आणि शेतीच्या नवीन हंगाम उभा करण्यासाठी शेतकऱ्यांना भांडवलाची गरज असतांना तसेच चाळींमधला कांद्याचे सडण्याचे प्रमाण वाढत असल्याने बेमुदत बाजार समित्यांचे कामकाज बंद राहिल्यास जेव्हा बाजार समित्यांचे कामकाज सुरू होईल तेव्हा कांद्याची एकदम आवक होऊन कांद्याच्या बाजार भावात मोठी घसरण होऊन शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान होईलकांदा उत्पादकांचे हे नुकसान टाळण्यासाठी 27 ऑक्टोबर 2020 पासून तात्काळ आपल्या कळवण कुषि उत्पन्न बाजार समितीचे व उपबाजार समितीचे कामकाज सुरू करावे अशी मागणी तालुकाध्यक्ष विलास रौदळ तालुका उपाध्यक्ष मुन्ना पगार, तालुका संघटक राजेश्वर शिरसाठ, तालुका सह संघटक प्रल्हाद गुंजाळ, तालुका सरचिटणीस युवराज वाघ, तालुका प्रसिद्धी प्रमुख विजय पाटील, तालुका युवा अध्यक्ष मयूर पाटील यांनी केली.

कळवण बाजार समितीचे जनसंपर्क अधिकारी अतुल पगार यांना निवेदन देतांना विलास रौदळ, मुन्ना पगार, तालुका संघटक राजेश्वर शिरसाठ, प्रल्हाद गुंजाळ, युवराज वाघ, विजय पाटील, मयूर पाटील. 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डStrikeसंप